पायाभूत सुविधांसाठी विक्रमी गुंतवणूक : नरेंद्र मोदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नरेंद्र मोदी

पायाभूत सुविधांसाठी विक्रमी गुंतवणूक : नरेंद्र मोदी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भोपाळ : आधुनिक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी भारत सरकारतर्फे विक्रमी गुंतवणूक केली जात आहे. शिवाय, हे प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब होऊ नये, यासाठीही प्रयत्न केले जात आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज येथील पुनर्विकसित केलेल्या रेल्वे स्थानकाचे लोकार्पण आणि उद्‌घाटन करण्यात आले. या पुनर्विकसित रेल्वे स्थानकाला गिनौरगढच्या राणी कमलापती यांचे नाव देण्यात आले आहे. यावेळी बोलताना मोदी म्हणाले की,‘‘ राणी कमलापती यांचे नाव रेल्वेस्थानकाला दिले गेल्याने रेल्वेच्या सन्मानात भर पडली आहे. एकेकाळी केवळ विमानततळांवर उपलब्ध असलेल्या सुविधा आता या रेल्वेस्थानकामध्येही मिळू शकणार आहेत. आधुनिक पायाभूत सुविधांच्या उभारणीतच केवळ विक्रमी गुंतवणूक केली जात नसून या प्रकल्पांच्या उभारणीत अडथळे येऊ नयेत, त्यांना विलंब होऊ नये, यासाठीही विशेष प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, हबीबगंज रेल्वेस्थानकाचे नामांतर करत राणी कमलापती असे नाव दिले.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

बिरसा मुंडा यांना आदरांजली

थोर आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केल्या गेलेल्या ‘जनजाती गौरव दिवसा’च्या कार्यक्रमासाठी मोदी येथे आले होते. यानिमित्त आयोजित केलेल्या महासंमेलनात सहभाग घेत मोदींनी बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी काँग्रेसवर टीका केली. केंद्रातील पूर्वीच्या सरकारने आदिवासींच्या विकासाकडे पुरेसे लक्ष दिले नाही, त्यांना मुलभूत सुविधांपासूनही वंचित ठेवले गेले, असा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, मोदींच्या हस्ते आज आदिवासी समाजासाठी विविध योजना सुरु करण्यात आल्या. ‘रेशन आपके ग्राम’ याअंतर्गत त्यांच्या गावात रेशन पोहोचते केले जाणार आहे. तसेच सिकल सेल मिशनचेही त्यांनी उद्घाटन करत लाभार्थींना समुपदेशन कार्डचे वाटप केले. मोदींनी ५० एकलव्य निवासी शाळा उभारणीच्या प्रकल्पाचे भूमिपूजनही केले.

स्थानकाची वैशिष्ट्ये

देशातील हे पहिले आयएसओ प्रमाणपत्र मिळालेले रेल्वेस्थानक

खासगी-सार्वजनिक भागीदारीतून उभारलेलेही हे पहिले रेल्वे स्थानक

देशातील पहिले जागतिक दर्जाचे रेल्वे स्थानक

आंतरराष्ट्रीय विमानतळांवर असलेल्या सुविधा येथेही उपलब्ध

फलाटावर पोहोचण्यासाठी इलेक्ट्रिक जिने

गाडीच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांसाठी ११०० खुर्च्या

फूड कोर्ट, रेस्टॉरंट, वातानुकूलित प्रतिक्षा कक्ष, १६० सीसीटीव्ही कॅमेरा

एकूण खर्च : ४५० कोटी रुपये

loading image
go to top