पाण्याच्या ड्रममध्ये बसून नगरसेवकाचे अनोखे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

बेळगाव: बेळगाव शहरातील वंटमुरी कॉलनीतील बेघर वसाहतींमधील अनुसूचीत जाती व जमातीच्या कुटुंबांची पाणीपट्टी माफ करावी या मागणीसाठी नगरसेवक दिनेश नाशिपुडी यांनी आज (गुरूवार) महापालिका कार्यालयासमोर पाण्याच्या ड्रममध्ये बसून अनोखे आंदोलन केले.

या वसाहतीमधील कुटुंबांना राखीव निधीतून नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. आता पाणीपुरवठा मंडळाने प्रत्येक कुटुंबाला तीन हजार रूपये पाणीपट्टी भरण्याची नोटीस पाठविली आहे. याविरोधात नगरविकास खात्याकडे तक्रार केल्यानंतर वाढीव पाणीपट्टी प्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना पाणीपुरवठा मंडळाला देण्यात आली आहे. पण मंडळाकडून पाणीपट्टी वसुली सुरूच ठेवली आहे, असा आरोप यावेळी नाशिपुडी यानी केला.

बेघर वसाहतींमधील सर्व कुटुंबांची पाणीपट्टी माफ केली जावी. या कुटुंबांचे वास्तव्य असलेल्या घरांची डागडुज्जी केली जावी, अशी मागणीही त्यानी केली. आठ दिवसात मागणी मान्य झाली नाही तर पुन्हा पाण्याच्या ड्रममध्ये बसून बेमुदत आंदोलन केले जाईल, असा इशारा नाशिपुडी यानी दिली. यावेळी वंटमुरी बेघर वसाहतींमधील रहिवासी व नगरसेवक उपस्थित होते.

Web Title: belgaum news corporator strike for water bill