अल्पवयीन मुलाच्या फेसबुक मित्रांकडून पालकांना धमकी

वृत्तसंस्था
शनिवार, 27 मे 2017

बंगळूरः सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या फेसबुक व त्यावर असलेल्या अल्पवयीन मुलाच्या मित्रांनी एक कोटी रुपयांची खंडनी पालकांना मागितल्याचा प्रकार घडला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

बंगळूरः सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या फेसबुक व त्यावर असलेल्या अल्पवयीन मुलाच्या मित्रांनी एक कोटी रुपयांची खंडनी पालकांना मागितल्याचा प्रकार घडला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खासगी कंपनीत काम करत असेलेल्या पालकांच्या (वय 44) अल्वपयीन मुलाचे (वय 13) फेसबुकवर खाते आहे. जून 2016 पासून तेजल पटेल नावाने खाते असेलला मुलाचा मित्र आहे. तेजल पटेलने अल्पवयीन मुलाच्या पालकांकडे एक कोटी रुपयांची खंडनी मागितली आहे. खंडनी न दिल्यास सोशल नेटवर्किंगवर अश्लील छायाचित्रे तयार करून अपलोड करण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर पालकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

पालकांनी सांगितले की, 'तेजल पटेलकडून सतत अश्लिल छायाचित्रे व व्हिडिओ मुलाला येत होती. त्याने आपल्या अल्पवयीन मुलाकडे नग्न छायाचित्रे मागितली होती. माझ्या मुलानेही त्याला नग्नावस्थेतील छायाचित्रे पाठविली होती. त्याने ती अश्लीलपणे बनवून मला व माझ्या पत्नीला पाठवून एक कोटी रुपयांची खंडनी मागितली. पैसे न दिल्यास संबंधित छायाचित्रे सोशल नेटवर्किंगवर अपलोड करेल, अशी धमकी त्याने दिली. या छायाचित्रांचा त्याच्याकडून गैरवापर होण्याची शक्यता आहे. शिवाय, अशा पद्धतीने त्याने इतर मुलांनाही फसविण्याची शक्यता आहे.'

दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू केला आहे.

ताज्या बातम्याः

Web Title: Bengaluru news: Minor's Facebook friend blackmails parents