दिल्लीत 'भारत बंद'चा परिणाम, वाहतुक व्यवस्था विस्कळीत

'अग्निपथ योजने'विरोधात 'भारत बंद'ची हाक
Bharat Bandh Against Agnipath Scheme
Bharat Bandh Against Agnipath Schemeesakal

नवी दिल्ली : 'अग्निपथ योजने'विरोधात काही संघटनांकडून आज सोमवारी (ता.२०) देशात 'भारत बंद'ची हाक देण्यात आली आहे. त्याचा परिणाम राष्ट्रीय राजधानीत पाहायला मिळत आहे. प्रचंड राहदारीमुळे दिल्ली-गुरुग्राम द्रुतगती महामार्गावरील शार्होल सीमेवर वाहतुक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. दिल्ली (Delhi) पोलिसांनी वाहनांच्या तपासाला सुरुवात केली आहे. (Bharat Bandh Against Agnipath Scheme, Heavy Traffic Jam On Delhi Gurugram Expressway)

Bharat Bandh Against Agnipath Scheme
गुजराती अग्निपथ योजनेला विरोध करत नाहीत, अभिनेत्याच्या ट्विटवर लोक संतापले

केंद्रीय गृहमंत्रालयाने रविवारी (ता.१९) ३५ व्हाॅट्सअप ग्रुपवर बंदी घातली आहे. या ग्रुपवरुन खोट्या बातम्या शेअर करण्यात आले होते. तसेच १० जणांना अटक केली गेली. काँग्रेस पक्षानेही दिल्लीत सत्याग्रह आंदोलन करुन अग्निपथ योजनेविरोधात (Agnipath Scheme) आंदोलन करणाऱ्या तरुणांना पाठिंबा जाहीर केले. हिंसा न करता शांततेने आंदोलन करण्याचे आवाहन काँग्रेसचे महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी आंदोलकांना केले आहे.

Bharat Bandh Against Agnipath Scheme
'पंकजा मुंडेंना सापत्न वागणूक, फडणवीस अन् पाटील उपहासात्मक बोलून हिणवतात '

गेल्या मंगळवारी लष्करातील भरतीसाठी अग्निपथ योजनेची घोषणा करण्यात आली. त्यानंतर देशभरातील तरुणांनी या योजनेला विरोध सुरु केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com