शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ 5 डिसेंबरला 'भारत बंद'ची हाक

FARM LAWS PROTEST
FARM LAWS PROTEST

नवी दिल्ली : सध्या ट्विटरवर #5दिसंबरभारतबंद हा हॅश्टॅग ट्रेंड होतेय. ट्रायबल आर्मीने 5 डिसेंबर रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे. सध्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ही भारत बंदची हाक देण्यात आली आहे. ट्रायबल आर्मीचे प्रमुख हंसराज मीना यांचं भारत बंदची हाक देणारं ट्विट सध्या मोठ्या प्रमाणावर रि-ट्विट केलं जातंय. शेतकरी नेत्यांनी सरकारसोबतच्या चर्चेत हे कायदे रद्द करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. 

हंसराज मीना यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, पंतप्रधान मोदी अदानी-अंबानींसोबत काही मिनिटांतच करार करतात मात्र, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायला ते इतका वेळ का घेतायत? शेतकऱ्यांइतका देशभक्त कुणीच असू शकत नाही. ऑल इंडिया परिसंघानेही त्यांच्या या भारत बंदला समर्थन दिलंय. मात्र, अद्याप मोठ्या व्यापार संघाने या आवाहनाला प्रतिसाद दिला नाहीये.

काल गुरुवारी शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये चर्चेची चौथी फेरी झाली. यामध्ये शेतकरी संघटनांचे सुमारे 35 नेते सहभागी झाले होते. पण अद्याप कोणत्याही ठोस निर्णय झालेला नाहीये. चारही चर्चा अयशस्वी ठरल्या आहेत. चर्चेची पाचवी फेरी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात होणार आहे. 

कृषी व्यवस्थांमध्ये बदल करणारे हे तीन कायदे सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारने आवाजी मतदानाने पारित केले होते. या कायद्यांना निव्वळ विरोधी पक्षांनीच नव्हे तर एनडीएतील घटक पक्षांनीही विरोध दर्शवला आहे. पंजाब आणि हरियाणा राज्यातले शेतकऱ्यांनी या कायद्याविरोधात पहिल्यापासूनच रान पेटवलं आहे. आणि आता गेल्या 9 दिवसांपासून ते दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत सरकारविरोधात आंदोलन करताहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com