भारत बायोटेक बनविणार एक अब्ज डोस; वॉशिंग्टन विद्यापीठाशी करार

covid 19 test swab
covid 19 test swab

हैदराबाद - भारत बायोटेकने अमेरिकेतील विद्यापीठाशी करार केला असून कोरोनावरील एक अब्ज डोसचे उत्पादन करण्याची घोषणा बुधवारी केली. अमेरिकेतील मिजुरी प्रांतातील सेंट लुईस येथील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कुल ऑफ मेडिसीनशी परवाना करार करण्यात आला. लशीचे वितरण, जास्त किंमत किंवा आवश्यक लोकांच्या लसीकरणासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचा तुटवडा अशा समस्यांवर या करारामुळे मात करता येईल अशी अपेक्षा आहे. या करारामुळे कंपनीला अमेरिका, जपान आणि युरोप वगळता सर्व बाजारपेठांत या लशीचे वितरण करण्याचे हक्क मिळाले आहेत.

मानवावरील चाचण्यांचा पहिला टप्पा सेंट लुईस विद्यापीठातील परीक्षण केंद्रात पार पडेल. त्यानंतरचे प्रयोगशाळेतील चाचण्यांचे टप्पे भारतात घेण्याची कंपनीला अपेक्षा आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या नियामक संस्थेची मान्यता मिळवण्यात येईल. मोठ्या प्रमाणावरील उत्पादन हैदराबादमधील जिनोम व्हॅली येथील कारखान्यात केले जाईल.

फायदा नाकातील थेंबांचा
कोरोनावरील बहुतांश लशींचे स्वरूप इंजेक्शनचे आहे. भारत बायोटेकचे डोस मात्र नाकात घालायच्या थेंबाच्या स्वरूपात आहेत. अशा डोसमुळे कोविड-19 रोगापासून संरक्षण होईल. प्रामुख्याने नाक आणि घसा यांतील पेशींमध्ये डोस जाणार असल्यामुळे इतर प्रकारची प्रतिकारशक्ती सुद्धा निर्माण होईल. सध्या संशोधन सुरू असलेल्या इतर लशींमुळे हे साध्य होऊ शकणार नाही, अशी माहिती - डॉ. कुरीयल यांनी दिली.

हे वाचा - मोदींसोबत शाहीनबागच्या 'दादी'देखील आहेत 'टाइम'च्या प्रभावशाली व्यक्तीच्या यादीत

आमच्या कल्पनेप्रमाणे एक अब्ज व्यक्तींना एक वेळ डोस देण्यात येईल. नाकातून थेंब घालण्याची प्रक्रिया सुटसुटीत असेल. त्यामुळे सुया, सिरींज, आदींची गरज भासणार नाही. परिणामी लसीकरणाचा एकूण खर्चही लक्षणीयरित्या कमी होईल.
- डॉ. कृष्ण एला, भारत बायोटेकचे चेअरमन

नाकातून एकवेळा थेंब घालून परिणामकारक लसीकरण राबवण्याची क्षमता हा मोठा फायदा आहे. त्यामुळे लसीकरणाची व्याप्ती वाढेल आणि ते राबवणेही सुकर होईल.
- डॉ. डेव्हिड टी कुरीयल, वॉशिंग्टन विद्यापीठाचे संचालक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com