esakal | धक्कादायक! भारतात कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या स्वयंसेवकाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

vaccin

कोव्हॅक्सिन लशीच्या वैद्यकीय चाचणीत सहभागी झालेल्या दीपक मारावी या स्वयंसेवकाला लस टोचल्याच्या दहा दिवसांनंतर त्याचा मृत्यू झाला. 

धक्कादायक! भारतात कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या स्वयंसेवकाचा मृत्यू

sakal_logo
By
टीम ई सकाळ

भोपाळ  - मध्य प्रदेशात कोव्हॅक्सिन लशीच्या वैद्यकीय चाचणीत सहभागी झालेल्या दीपक मारावी या स्वयंसेवकाला लस टोचल्याच्या दहा दिवसांनंतर त्याचा मृत्यू झाला. पीपल्स वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे कुलगुरू डॉ. राजेश कपूर यांनी शनिवारी दिली. स्वयंसेवकाचा मृत्यू विषबाधेने झाला असल्याचा संशय सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र व्हिसेरा तपासल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल, असेही सांगण्यात आले.

मारावी यांना १२ डिसेंबर रोजी लस देण्यात आली होती. त्यांचा मृत्यू २१ डिसेंबरला झाला. त्याबद्दल औषध नियंत्रण महासंचालकांना आणि या लशीचे निर्माते भारत बायोटेक यांना कळविण्यात आले होते, असे डॉक्टर कपूर म्हणाले. मृतदेहाचे पोस्टमार्टेम केलेल्या डॉक्टरांनी मारावी यांचा मृत्यू विषबाधेने झाल्याचा संशय व्यक्त केला, असल्याचे मध्य प्रदेश मेडिको लीगल इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर अशोक शर्मा यांनी सांगितले. व्हिसेरा तपासल्यानंतरच मृत्यूचे कारण समजेल, असा खुलासा त्यांनी केला.

हे वाचा - भारतात कोरोना लसीकरणाला होणार सुरुवात; तारीखही निश्चित

मारावी यांनी स्वतःहून लस टोचून घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार सर्व नियमानुसार त्यांना चाचणीत सहभागी होण्यास परवानगी दिल्याचा दावा डॉक्टर कपूर यांनी केला. मात्र त्यांना इंजेक्शनमधून लस दिली की सलाइनद्वारे याची खात्रीशीर माहिती नसल्याचे सांगून लसीकरणानंतर त्यांना ३० मिनिटे निरीक्षणाखाली ठेवले व त्यानंतरच त्यांना घरी सोडण्यात आले, असा दावा डॉक्टरांनी केला. त्यांच्या प्रकृतीवर ७-८ दिवस देखरेख ठेवली होती, असे ते म्हणाले. दरम्यान, राज्याचे आरोग्य मंत्र्यांना यासंदर्भात प्रतिनिधीने दूरध्वनी केला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

हे वाचा - इंडोनेशियात 59 प्रवाशांना घेऊन उड्डाण केलेल्या विमानाचा संपर्क तुटला, काही क्षणात रडारवरुन गायब

लस दिल्यावर खालावली प्रकृती
मारावी हे आदिवासी समाजातील होते. ते मजुरी करीत असत. लसीकरणानंतर घरी आल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. काही दिवसांनंतर खांदे दुखत असल्याची तक्रार त्यांनी १७ डिसेंबरला केली होती. चार दिवसांनंतर प्रकृती जास्तच खालावल्याने त्यांना रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचे निधन झाले, अशी माहिती त्यांच्या कुटुंबाने दिली. लशीच्या चाचणीत सहभागी होण्यासाठी मारावी यांची परवानगी घेतली नव्हती आणि सहभागाबद्दल कोणताही पुरावा त्यांना दिला नाही, असा आरोप भोपाळमधील सामाजिक कार्यकर्ते रचना धिंग्रा यांनी केला. रुग्णालयाने हा आरोप फेटाळला आहे.

loading image
go to top