Bharat Jodo Yatra : 52 वर्षी राहुल गांधींच्या पुशअप्स; लहानग्यासोबत लावली स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi Viral Video
Bharat Jodo Yatra : 52 वर्षी राहुल गांधींच्या पुशअप्स; लहानग्यासोबत लावली स्पर्धा

Bharat Jodo Yatra : 52 वर्षी राहुल गांधींच्या पुशअप्स; लहानग्यासोबत लावली स्पर्धा

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सुरू झाली आणि सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू झाली. गेल्या एक महिन्यांपासून सुरू असलेल्या यात्रेतले अनेक फोटो व्हिडीओ, सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कधी लहान मुलांसोबत खेळताना, तर कधी आईच्या शूजची लेस बांधतानाचे फोटो समोर येतात. असाच एक व्हिडीओ आता समोर आला आहे.

हेही वाचा: Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत राहुल गांधी बनले आधुनिक श्रावणबाळ

भारत जोडो यात्रेमधल्या या व्हिडीओमध्ये राहुल गांधी चक्क पुशअप्स मारताना दिसत आहे. यामध्ये त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेते डी.के.शिवकुमार हेही आहेत. एका बाजूला ५२ वर्षीय राहुल गांधी आहेत तर दुसऱ्या बाजूला एक लहान मुलगा पुशअप्स करत आहे. पण त्यांच्यासोबत असलेले शिवकुमार आणि केसी वेणुगोपाल यांना फार काळ पुशअप्स मारायला जमलेलं नाही, असं दिसतंय.

हेही वाचा: Bharat Jodo Yatra : ‘भारत जोडो’ अडविण्याचा प्रयत्न; रणदीप सुरजेवाला

राहुल गांधी देशभरात ही भारत जोडो यात्रा करत आहेत. या यात्रेला आबालवृद्धांचा प्रतिसाद मिळत आहे. आणखी एका व्हिडीओमध्ये एक लहानगा सुरक्षा यंत्रणा भेदून राहुल गांधींजवळ येतो आणि त्यांचा पापा घेतो, असं दिसत आहे. यावेळी सचिन पायलट आणि काँग्रेसचे इतर नेतेही गांधी यांच्यासोबत आहेत.