आता भूतानचीही हिंमत वाढली, भारताविरोधात धाडसी पाऊल

सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 June 2020

पाकिस्तान, चीन आणि नेपाळसोबत संघर्षाचे वातावरण असताना आता भूतानसारख्या लहानशा देशानेही आता डोके वर काढले आहे.

गुवाहाटी - भारताच्या सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तान आधीच डोकेदुखी असताना त्यात नेपाळने त्यांच्या नकाशात भारताचा भूभाग दाखवला आहे. त्यानंतर चीनने गलवान खोऱ्यात घुसखोरीचा कट आखला आहे. पाकिस्तान, चीन आणि नेपाळसोबत संघर्षाचे वातावरण असताना आता भूतानसारख्या लहानशा देशानेही आता डोके वर काढले आहे. भारत आणि भूतानचे संबंध तसे चांगले आहेत मात्र भूतानने आसामामधील बक्सा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पाणी अडवले आहे. 

ओसामा बिन लादेन हुतात्मा; इम्रान खान यांचं संसदेत खळबळजनक वक्तव्य

बक्सामधील शेतकरी भूतानच्या या कृतीने त्रासले आहेत. पाणी अडवल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या असून शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. बक्सा जिल्ह्यातील 26 हून अधिक गावांमध्ये जवळपास 6 हजार शेतकरी पाण्यासाठी डोंग योजनेवर अवलंबून आहेत. 1953 नंतरच स्थानिक शेतकरी त्यांची शेती भूतानमधून येणाऱ्या नद्यांच्या पाण्यावर करत आहेत. 

नेहरुंच्या काळातील कार्याचे पंतप्रधान मोदींनी गायले गोडवे, दक्षिण कोरियात दाखवला व्हिडिओ

गेल्या दोन तीन दिवसांपासून बक्सातील शेतकरी आणि संघटनांनी याविरोधात आंदोलन करत आहेत. सोमवारी आंदोलकांनी अनेक तास रोंगिया भूतान रास्ता रोको आंदोलन केलं. केंद्र सरकारने भूतानसमोर हा मुद्दा उचलून धरावा आणि यावर काहीतरी मार्ग काढावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

भारत-चीन वादाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनच्या पंतप्रधानांचे मोठं वक्तव्य, म्हणतात...

दरवर्षी या हंगामात भारताचे शेतकरी भारत भूटान सीमेवरील समद्रूप जोंगखार भागात जातात आणि काला नदीचे पाणी त्यांच्या शेताकडे वळवतात. यावर्षी भूतानने कोरोना व्हायरसमुळे भारतीय शेतकऱ्यांना प्रवेश देण्यास नकार दिला आहे. आता शेतकऱ्यांनी म्हटलं आहे की, सर्व प्रकारचे आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल पाळले जात आहेत तर जलसिंचनात काय अडचण आहे. यावर अद्याप राज्य किंवा केंद्र सरकार यांच्याकडून प्रतिक्रिया आलेली नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhutan stopped to indian farmers enter in jongkhar