भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी होणार मोठी घडामोड

india china
india china

नवी दिल्ली, ता. 04 - भारत आणि चीन या देशांमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. पूर्व लडाखमध्ये या दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांसमोर आले आहे. या पार्श्वभूमीवर भारत आणि चीन या देशातील लेफ्टिनेंट जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये शनिवारी बैठक होणार आहे. भारत-चीन सीमेच्या लडाखमधील चुशूल येथे ही बैठक होणार आहे. भारत-चीनमधील तणाव संपवण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्वाची मानली जात आहे. 

बैठकीआधी दोन्ही देशांचे सैनिक काहीसे मागे घडले आहे. मात्र, सैन्याने याबाबत अधिकृतपणे काही सांगितलं नाही. दोन्ही देश चर्चेसाठी तयार झाले असल्याने यातून काही तोडगा निघतो का हे पाहावं लागेल. याआधीही हे देश अनेक वेळा एकमेकांसमोर आले आहेत. 

पैंगोग, गालवान व्हॅली भागात चीनने मोठ्या प्रमाणात सैन्य तैणात केले होते. तसेच चिनी सैन्य तिबेटच्या भागात युद्ध अभ्यास करत होते. त्यामुळे चीन युद्धाची तयारी करत असल्याची शंका घेतली जात होती. भारताने प्रत्युत्तरासाठी सीमा भागात सैन्याची जमवाजमव सुरु केली होती. चीनच्या दबावाला बळी न पडता भारतानेही दबावतंत्राचा वापर केला होता. पेट्रोल पॉइंट 14 आणि दौलत बेग ओल्डी यांना जोडणाऱ्या रत्त्याचे निर्माण भारताकडून सुरु होते. याला थांबवने चीनचा उद्देश होता. मात्र, भारताने निर्माण कार्य सुरुच ठेवले. 

चिनी सैन्याने गालवान भागात एलएसी पार केलेली नाही. सध्याचा तणाव फिंगर एरियावरुन सुरु आहे. मात्र, मिलिट्री आणि राजकीय स्तरावर चर्चा सुरु झाल्याने हा वाद निवळण्याची चिन्ह आहेत. अशीच परिस्थिती 2013 मध्ये देपसांग आणि 2014 मध्ये चुमुर भागात निर्माण झाली होती. डोकलामध्येही भारत-चीन सैन्यामध्ये तणाव निर्माण झाला होता. मात्र, भारत दबावाला बळी पडत नाही हे समजल्यावर चिनी सैनिकांनी माघार घेतली होती. त्यामुळे शनिवारच्या बैठकीनंतर चीन माघार घेण्याची शक्यता आहे.

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी भारत-चीन तणावावर भाष्य केलं होतं. तसेच अमेरिकेने देऊ केलेल्या मध्यस्थीला नकार दिला होता. दोन्ही देश चर्चा करुन मार्ग काढू शकतात. त्यामुळे आम्हाला कोणाच्याही मदतीची आवश्यकता नाही, असं जिनपिंग म्हणाले होते. त्यामुळे लवकरच चर्चेतून मार्ग निघण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com