Crime News: भाजपा आमदाराच्या पुतण्याची भर बाजारात निर्घृण हत्या, हत्येनंतर तणावाचं वातावरण

Crime News: बिहारमधील कोडा येथील भाजप आमदार कविता पासवान यांच्या पुतण्याची नीरज पासवान यांची बुधवारी कटिहारमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
Crime News
Crime NewsEsakal

बिहारमधील कटिहारमध्ये आज(बुधवारी) सकाळी भाजप आमदार कविता पासवान यांचा पुतण्या नीरज पासवान यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. यानंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही अज्ञातांनी नीरज पासवान यांच्यावर गोळ्या झाडल्या. (bihar bjp mla kavita paswan nephew neeraj paswan shot dead tension in katihar Bihar)

घटनेनंतर नीरजला जखमी अवस्थेत वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच एएसपी शशी शंकर कुमार, शहर पोलीस ठाण्याचे प्रमुख सुमन कुमार सिंग यांनी त्यांच्या पथकासह घटनास्थळ गाठले आणि छापा टाकून एका आरोपीला अटक केली. तसेच, शस्त्रे जप्त करण्यात आल्याचे पोलीस सांगत आहेत.

Crime News
Sambhaji Nagar Crime News : घर फोडून तीन लाखांचा ऐवज लंपास ; नारेगाव, भाट गल्ली येथील घटना

मृत नीरज पासवान यांचा मृतदेह कटिहार मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमची प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. नीरज पासवान हा रेल्वे कर्मचारी दिनेश पासवान यांचा मुलगा आणि कोडा येथील भाजप आमदार कविता पासवान यांचा पुतण्या आहे.

Crime News
Crime News: 80 लाख खर्च करून तरुण बनला 'दीपा', प्रियकराने दिला लग्नाला नकार, अन्....

स्थानिक लोक या घटनेचा संबंध महापौर शिवराज पासवान यांच्या हत्येशी जोडत आहेत. याप्रकरणी पोलीसांकडून कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही.

नीरज पासवान बुधवारी सकाळी ड्रायव्हर टोला येथील घराजवळ होते. त्यानंतर अचानक दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला. 6 गोळ्या लागल्याने नीरजचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नीरज जिवंत असल्याचे समजून स्थानिक लोकांनी त्याला रुग्णालयात नेले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Crime News
Pune Crime : मोबाईल चोरटे बेलगाम! आठवडे बाजारामध्ये पोलिसांकडून गस्त घालण्याची मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com