पाटणा : स्थलांतरित मजुरांचे पुन्हा ‘बिहार चलो रे’

कोरोनाच्या फैलावामुळे लॉकडाउनची भीती; गाव गाठण्याची घाई
पाटणा-इन्दूर एक्स्प्रेस
पाटणा-इन्दूर एक्स्प्रेसsakal

पाटणा : देशात कोरोनाची (Corona wave)नवी लाट आली असल्याने अनेक शहरांमध्ये कडक निर्बंध लागू केले आहेत. कोरोनारुग्णांची संख्या आणखी वाढल्यास लॉकडाउनची(Lockdown) भीती असल्याने रोजगारासाठी व शिक्षणासाठी बाहेर गेलेले बिहारी (Bihar)नागरिक पुन्हा एकदा गावाकडे परतण्यास सुरुवात झाली आहे.

पाटणा-इन्दूर एक्स्प्रेस
लसीकरण केंद्रासाठी वेळेची मर्यादा नाही : केंद्राकडून स्पष्टीकरण

पहिल्या लॉकडाउनप्रमाणेच मुंबई, दिल्ली, अमृतसर, अहमदाबाद या शहरांसह अनेक राज्यांमधून बिहारला येणाऱ्या रेल्वेगाड्या ‘फुल’ झाल्या आहे. आरक्षणाची प्रतीक्षा यादी वाढत चालली आहे. दिल्लीहून पाटण्याला येणाऱ्या सप्तक्रांती, स्वतंत्रता सेनानी एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी १००च्या पुढे पोचली आहे. पाटणा, भागलपूर किंवा मुझफ्फरपूर आदी स्थानकांवर मजुरांची गर्दी होऊ लागली आहे. बसण्यास जागाच मिळत नसल्याने डब्यात कसेतरी घुसून बिहारला सुखरूप पोचत असल्याचे स्थलांतरित मजुरांनी सांगितले.

पाटणा-इन्दूर एक्स्प्रेस
राजभवनाचे स्पष्टीकरण, मंत्रिमंडळ विस्तारावेळी वेळेची कोणतीही मर्यादा नाही

कोरोनाचे सावट पुन्हा घोंघावू लागल्याने सप्तक्रांती एक्स्प्रेसने मुझफ्फरपूरला पोचलेल्या मजुरांचे चेहरे उदास दिसत आहेत. ‘‘दिल्लीत शनिवार व रविवारी लागू झालेली संचारबंदी दोन महिन्यांपर्यंत वाढण्याच्या भीतीने तेथील अनेक कंपन्या बंद झाल्या आहेत. कारखानेही बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. गेल्यावेळी दिल्लीत सुरुवातीला एक दिवसाची संचारबंदी होती तर पुढे लॉकडाउन झाल्याने आम्हाला बिहारला परतणे अवघड झाले होते. खाण्यापिण्याचेही हाल झाले. आता पुन्हा तशीच परिस्थिती उद्‍भवल्याने आम्ही आधीच गाव गाठले आहे,’’ असे काही स्थलांतरित कामगारांनी सांगितले. गेल्या तीन वर्षांपासून अशी भयावह स्थिती आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेऊनही त्‍यात बदल झालेला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

पाटणा-इन्दूर एक्स्प्रेस
लसीकरण@ 24x7; केंद्राचा निर्णय, वेळेची मर्यादा हटविली

विद्यार्थीही परतीच्या वाटेवर

दिल्ली, डेहराडूनसह अनेक शहरांमध्ये शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली असून ऑनलाइन वर्ग पुन्हा सुरू झाले आहेत. यामुळे मूळ बिहारचे विद्यार्थी घरी परतू लागले आहेत. शिक्षणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या डेहराडून, कोटा येथून मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी रेल्वे, विमानांनी बिहारला पोहतच आहेत. ‘‘डेहराडूनमध्ये लॉकडाउन झाल्याने आम्ही घरी परतलो आहोत. आता येथूनच ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवणार आहोत,’’ असे तेथून आलेली विद्यार्थिनी आकृती व तिच्या मैत्रिणीने सांगितले.(Bihar Chalo re)

पाटणा-इन्दूर एक्स्प्रेस
तुमचे हृदय 28 टक्केच काम करीत आहे, डोळे तपासायला गेलेल्या आजीबाईंची केली डॉक्टरांनीच दिशाभूल

नियमांचे उल्लंघन

महानगरांमधून भरभरून येणाऱ्या रेल्वेत सुरक्षित अंतराचे पालन नावालाही होत नसल्याचे दिसत. अनेक प्रवासी मास्कही लावत नसल्याने कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात फैलावण्याची भीती आहे. प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. मास्क तपासणीच्या नावाखाली जुजबी कार्यवाही केली जात आहे. रेल्वे स्थानकावर मास्कविना येणाऱ्या आणि तसाच प्रवास करणाऱ्या व प्रवाशांची छायाचित्रेही व्हायरल झाली आहेत.

दिल्लीला परत जाण्याचा हिंमत नाही

सरैया येथे राहणारा विकास हा छटपूजेनंतर दिल्लीला गेला होता. तो वस्त्रनिर्मितीच्या कारखान्यात काम करीत होता. एक आठवड्यापासून कारखाना बंद आहे. मालकाने त्याला कामावरून काढून टाकल्याने रोजीरोटीची समस्या त्याला भेडसावू लागली. दुसरीकडे रोजगार मिळण्याचीही आशा नसल्याने अखेर त्याने बिहारचा रस्ता धरला. रेल्वे स्थानकावर त्‍याला नेण्यासाठी कुटुंबीय आले होते. त्यांना पाहून विकासचे डोळे भरून आले. आता पुन्हा दिल्लीला जाण्याची हिंमत नसल्याचे त्याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com