Nagaland : शरद पवारांच्या NCP नंतर नितीश कुमारांच्या आमदाराचा भाजप आघाडीला पाठिंबा!

नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) सात आमदारांनीही सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
Nagaland Assembly Election JDU NCP
Nagaland Assembly Election JDU NCPesakal
Summary

JDU, NCP, NPP, नागा पीपल्स फ्रंट, रामदास आठवलेंची RPI, LJP (रामविलास) आणि एका अपक्ष आमदारानंही नागालँडमध्ये युतीला पाठिंबा जाहीर केला आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) यांच्या जनता दल युनायटेडच्या (JDU) एकमेव आमदारानं बुधवारी नागालँडमधील भाजप-एनडीपीपी युती (BJP-NDPP Alliance) सरकारला पाठिंबा जाहीर केला.

जेडीयूचे प्रभारी आणि राष्ट्रीय महासचिव अफाक अहमद खान यांनी ही माहिती दिली. नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) सात आमदारांनीही सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

नागालँड विधानसभा निवडणुकीत (Nagaland Assembly Election) जेडीयूला केवळ एका जागेवर यश मिळालं. एनपीपी-भाजप युतीनं सलग दुसऱ्यांदा इथं सरकार स्थापन केलंय.

Nagaland Assembly Election JDU NCP
Tripura : काँग्रेस सोडून भाजपात दाखल झालेल्या माणिक साहांनी दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

या पाठिंब्याबाबत जेडीयूनं म्हटलंय, "आमच्या पक्षाच्या नागालँड अध्यक्षांनी जेडीयूच्या केंद्रीय नेतृत्वाशी सल्लामसलत न करता नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंब्याचं पत्र दिलं, हे अत्यंत अनुशासनात्मक आणि मनमानी पाऊल आहे. त्यामुळं जेडीयूनं नागालँडमधील पक्षाची राज्य समिती बरखास्त केलीये."

Nagaland Assembly Election JDU NCP
Delhi : सिसोदियांना तुरुंगात पाठवण्यामागं भाजपचं मोठं षडयंत्र; पत्रकार परिषद बोलावून 'आप'नं व्यक्त केली भीती

बिहारमधील सत्ताधारी पक्ष जेडीयू भाजपसोबतची युती तोडल्यानंतर आरजेडीसोबत सरकार चालवत आहे. नागालँडमधील आपल्या आमदाराच्या या निर्णयावर केंद्रीय नेतृत्वानं नाराजी व्यक्त केलीये. एकीकडं नितीशकुमार लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांना एकत्र करण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी त्यांच्याच पक्षाच्या आमदारानं भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.

Nagaland Assembly Election JDU NCP
Shiv Sena : पक्षाशी गद्दारी का केली? संतप्त शिवसैनिकांनी धैर्यशील मानेंना ताफा अडवून विचारला जाब

JDU, NCP, NPP, नागा पीपल्स फ्रंट, रामदास आठवलेंची RPI, LJP (रामविलास) आणि एका अपक्ष आमदारानंही नागालँडमध्ये युतीला पाठिंबा जाहीर केला आहे. एनडीपीपीचे अध्यक्ष नेफियू रिओ यांनी मंगळवारी नागालँडचे मुख्यमंत्री म्हणून पाचव्यांदा शपथ घेतली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com