Bihar BJP Victory and CM Post : बिहारमधील ऐतिहासिक विजयाने भाजप करणार मुख्यमंत्रिपदावर दावा?; नितीश कुमारांची ‘बार्गेन पॉवर’वर कमी झाली!

Bihar BJP Victory raises CM claim as Nitish Kumar’s bargaining power weakens : जाणून घ्या, भाजप नेते विनोद तावडे यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत आणि नितीश कुमारांबाबत नेमकं काय म्हटलंय?
Bihar BJP Victory raises CM claim as Nitish Kumar’s bargaining power weakens. Latest political analysis and power shift updates.

Bihar BJP Victory raises CM claim as Nitish Kumar’s bargaining power weakens. Latest political analysis and power shift updates.

esakal

Updated on

Bihar BJP’s Historic Victory and Its Political Impact : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आज समोर येत आहेत. यामध्ये सत्ताधारी एनडीए आघाडीला प्रचंड बहुमत मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. तर विरोधातील महाआघाडीची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए आघाडीचेच सरकार येणार असल्याचे चित्र आहे.

एनडीए आघाडीत भाजप सध्या ९४ जागांवर आघाडीवर असून जेडीयू ८४ जागांवर, एलजेपी १९, एचएएम ५, आरएलएम ४ जागांवर आघाडीवर दिसत आहे.  तर दुसरीकडे विरोधकांच्या महाआघाडीतील राजद अवघ्या २५ जागांवर तर काँग्रेस सारखा राष्ट्रीय पक्ष केवळ एक ते दोन जागांवरच दिसत आहे. प्रशांत किशोर यांच्या जनसूरालात भोपाळही फोडणं शक्य झालं नसल्याचे दिसत आहे. एकूणच या सर्वात भाजप सर्वाधिक जागां जिंकणार पक्ष ठरणार असल्याचे दिसत आहे.

यामुळे आता बिहारमधील एनडीए आघाडीची समीकरणं  बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण, बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. या परिस्थितीत आता एनडीए आघाडीचा मुख्यमंत्री कोण होणार यावरून चर्चांना उधाण आलं आहे.

Bihar BJP Victory raises CM claim as Nitish Kumar’s bargaining power weakens. Latest political analysis and power shift updates.
Pune Navale Bridge Accident Photo : पुण्यातील नवले पूलाजवळ घडलेल्या भयानक अपघातीची भीषणता दर्शवणारे फोटो

खरंतर निवडणुकीदरम्यान एनडीएने अनेक वेळा सांगितले होते की ते नितीशकुमार आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात निवडणूक लढवत आहेत, परंतु अधिकृतपणे नितीशकुमार यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित केले गेले नव्हते. त्यामुळे आता भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने भाजप मुख्यमंत्रिपदावर दावा करू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. शिवाय, भाजपच्या तुलनेत जदयूला कमीच जागा असल्याने नितीश कुमारांची बार्गेन पॉवरही कमी होणार असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

Bihar BJP Victory raises CM claim as Nitish Kumar’s bargaining power weakens. Latest political analysis and power shift updates.
Fake Tiger and Real Tiger Viral Video : खतरनाक!!! वाघाचं कातडं पांघरून जंगलातील वाघाच्या तोंडासमोर गेला पठ्ठ्या अन् मग...

त्यात सकाळपासून समोर येणारे निकाल पाहून सुरूवातीस जदयूकडून सोशल मीडियावर नितीश कुमारांचा फोट पोस्ट करून मुख्यमंत्री नितीश कुमारच असतील असं सांगितलं होतं. ''न भूतो न भविष्यति.. नितीश कुमार बिहार के मुख्यमंत्री होते, आहेत आणि राहतील..'' अशी ही पोस्ट होती. मात्र थोडाच वेळात ही पोस्ट हटवण्यात आली. त्यामुळे आता अधिकच चर्चांना उधाण आलं आहे.

Bihar BJP Victory raises CM claim as Nitish Kumar’s bargaining power weakens. Latest political analysis and power shift updates.
Man Kissing Cobra Video : भयानक!!! बहाद्दरानं चक्क ‘कोबरा’लाच केला ‘Lip lock Kiss’ ; थरारक व्हिडिओ व्हायरल

सध्याची परिस्थिती बघात भाजप जेडीयू सोडलं तर अन्य मित्र पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करू शकते. एनडीएचा भाग असलेल्या चिराग पासवान यांच्या एलजेपी-आरच्या २१ जागा, जितन राम मांझी यांच्या एचएएमच्या पाच आणि उपेंद्र कुशवाह यांच्या आरएलएमच्या चार जागा जोडल्यास एकूण १२१ जागा होतात. याचा अर्थ नितीश कुमार यांची राजकीय सौदेबाजीची शक्ती कमी झाली आहे.

Bihar BJP Victory raises CM claim as Nitish Kumar’s bargaining power weakens. Latest political analysis and power shift updates.
Vegetable Vendor Wins 11 crore Lottery Video : नशीब असावं तर असं! मित्राच्या पैशाने लॉटरीचं तिकीट खरेदी केलेल्या भाजी विक्रेत्याने जिंकलं तब्बल ११ कोटींचं बक्षीस

विनोद तावडे यांनी नेमकं काय म्हटलंय? -

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आम्ही कुठेही दिलेला नाही. आता मुख्यमंत्रिपदाबाबत एनडीए आघाडीमधील पाचही मित्र पक्ष चर्चा करून निर्णय घेणार. विरोधकांना मुद्दा मिळू नये म्हणून आधी नितीशकुमारांचं नाव जाहीर केलं नाही. विरोधकांनी नितीशकुमार आजारी असल्याच्या वावड्या उठवल्या होत्या. असंही भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com