Bihar Election Result 2025
esakal
बिहार विधानसभेसाठी नुकतंच मतदान पार पडलं आहे. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. आज सकाळी ७ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. काही तासांतच निकालाचं चित्र स्पष्ट होणार असून बिहारमध्ये एनडीए आणि ‘महागठबंधन’ यांच्यातील थेट लढतीत कोण बाजी मारणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. या निवडणुकीत विकास, बेरोजगारी, जातीय समीकरणं आणि महागाई हे मुद्दे ठळकपणे समोर आले. मुख्यमंत्री पदासाठी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांची नावं चर्चेत आहे. विशेष म्हणजे यंदा बिहारमध्ये रेकॉर्ड ब्रेक मतदान झाल्याचं बघायला मिळालं आहे. त्यामुळे सगळ्यांचीच धाकधूक वाढली आहे. अशावेळी मतदारांनी कुणाच्या बाजुने कौल दिलाय? हे अवघ्या काही तासांत स्पष्ट होणार आहे. बिहार विधानसभेत एकूण २४३ जागा असून बहुमतासाठी १२२ जागा जिंकाव्या लागणार आहेत. आजच्या निकालावर बिहारचं राजकीय भविष्य ठरणार आहे. तसचे पुढील पाच वर्षांच्या सत्तासमीकरणाची दिशा निश्चित होणार आहे. सर्व राजकीय पक्षांनीही मतमोजणी केंद्राबाहेर तळ ठोकला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.