Fact Check : केजरीवाल सरकारची मुस्लिम डॉक्टरांनाच मदत?

केजरीवाल यांनी शिक्षक असलेल्या सेओजी मिश्रा आणि नितीन तंवर, तसेच डॉ. जोगिंदर चौधरी, अशिम गुप्ता आणि राकेश जैन यांच्या कुटुंबीयांना आतापर्यंत १ कोटी रुपयांची भरपाई देण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalTwitter
Summary

केजरीवाल यांनी शिक्षक असलेल्या सेओजी मिश्रा आणि नितीन तंवर, तसेच डॉ. जोगिंदर चौधरी, अशिम गुप्ता आणि राकेश जैन यांच्या कुटुंबीयांना आतापर्यंत १ कोटी रुपयांची भरपाई देण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.

नवी दिल्ली : ९ मे रोजी दिल्लीच्या जीटीबी हॉस्पिटलमधील युवा डॉक्टर अनस सिद्दीकी यांचा मृत्यू झाला होता. कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या या तरुण डॉक्टरच्या मृत्यूनंतर दिल्ली सुन्न झाली होती. युवा डॉक्टरच्या मृत्यूची घटना दिल्लीकरांसाठी संवेदनशील अशीच होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी डॉ. अनस यांच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांचा धनादेश देत त्यांना मदतीचा हात दिला. दिल्ली सरकारने याआधीही दोन कोरोना योद्ध्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांच्या मदतीचा धनादेश दिला होता. यानंतर विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला आहे. या प्रकरणी 'द प्रिंट'ने फॅक्ट चेक करणाऱ्या संस्थेच्या सहकार्याने भाजपच्या आरोपांमध्ये तथ्य आहे का हे तपासले.

Arvind Kejriwal
कृषी कायद्याविरोधात 26 मे रोजी काळा दिवस

दिल्लीत आतापर्यंत जवळपास १०० डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे, पण केजरीवाल सरकार फक्त मुस्लिम डॉक्टरांच्या कुटुंबाला १ कोटी रुपयांची भरपाई देत आहे, असा आरोप भाजपने केला आहे. दिल्लीतील अनेक भाजप नेत्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून मुख्यमंत्री केजरीवाल यांना लक्ष्य केलं आहे.

दिल्लीत यावर्षी १०० डॉक्टर आणि ९२ शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. परंतु सरकारने भरपाईची रक्कम फक्त डॉ. अनास याच्या कुटुंबाला दिली आहे. हा भेदभाव बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे. ३१ मेपर्यंत सर्वांना समान भरपाई मिळाली नाही, तर जनहित याचिका दाखल करणार असल्याचे भाजप कार्यकर्ते वकील अश्विनी उपाध्याय यांनी म्हटले आहे. तसेच अनेक हिंदूंचे मृत्यू झाले, पण त्यांना भरपाई देणं दूर, केजरीवाल त्यांना भेटायलादेखील गेले नाहीत, असंही काही भाजप नेत्यांचं मत आहे.

Arvind Kejriwal
मॉन्सूनचा पुढील प्रवास वेगाने होणार, कारण...

दरम्यान केजरीवाल यांनी शिक्षक असलेल्या सेओजी मिश्रा आणि नितीन तंवर, तसेच डॉ. जोगिंदर चौधरी, अशिम गुप्ता आणि राकेश जैन यांच्या कुटुंबीयांना आतापर्यंत १ कोटी रुपयांची भरपाई देण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. तसेच स्वच्छता कर्मचारी राजू याच्या कुटुंबीयांनाही मदत केल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती 'द प्रिंट'ने फॅक्ट चेक करणाऱ्या संस्थेच्या सहकार्याने केलेल्या तपासणीत समोर आली आहे.

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी डॉ. अनस यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. डॉ. अनस यांचे वडील मुजाहिदुल इस्लाम हेदेखील डॉक्टर आहेत. संपूर्ण कुटुंब देशाची सेवा करण्यासाठी तयार असल्याचे मुजाहिदुल यांनी सांगितले आहे. डॉ. अनस यांच्या कुटुंबीयांची पाठी केजरीवाल सरकार ठामपणे उभे आहे, असंही केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com