केंद्रीय मंत्र्यांसह सनी देओल राष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानाला गैरहजर; कारण

केंद्रीय मंत्र्यांसह सनी देओल राष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानाला गैरहजर; कारण

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार आणि चित्रपट अभिनेता सनी देओल आणि केंद्रीय मंत्री संजय धोत्रे (Sanjay Dhotre) यांनी सोमवारी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान केले नाही. या दोघांव्यतिरिक्त आणखी सहा खासदार आहेत, ज्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान केलं नाही. आता सनी देओल (Sunny Deol) आणि धोत्रे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान न करण्याचं कारण समोर आलं आहे. (BJP MP News in Marathi)

केंद्रीय मंत्र्यांसह सनी देओल राष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानाला गैरहजर; कारण
डीएसीपींच्या हत्येनंतर पोलीस प्रशासन आक्रमक; म्हणाले खाण माफियांवर...

दरम्यान सनी देओल उपचारासाठी परदेशात आहे, तर केंद्रीय मंत्री धोत्रे आयसीयूमध्ये दाखल आहेत. त्यामुळे दोघेही मतदानासाठी हजर राहू शकले नाही. तर शिवसेनेच्या दोन खासदारांसह बहुजन समाज पक्ष (बसपा), काँग्रेस, समाजवादी पार्टी (एसपी) आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लीमीन (एआयएमआयएम) यांच्या प्रत्येकी एका खासदाराने मतदान केले नाही. याशिवाय तुरुंगात असलेले बसपा नेते अतुल सिंह मतदानासाठी येऊ शकले नाहीत. शिवसेनेचे नेते गजानन कीर्तीकर आणि हेमंत गोडसे यांनीही मतदान केले नाही. एआयएमआयएमचे नेते इम्तियाज जलील हेही मतदान न करणाऱ्या आठ जणांमध्ये होते.

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते पीपीई किट घालून मतदान केंद्रावर पोहोचले होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सपाचे संरक्षक मुलायम सिंह यादव व्हीलचेअरवर बसून मतदान केंद्रावर पोहोचले. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून मतपेट्या राजधानी दिल्लीत पाठविण्यात आल्या आहेत. सोमवारी रात्री उशिरा दिल्ली विधानसभेतील मतपेट्या स्ट्राँग रूममध्ये आणण्यात आल्या, तर कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, आसाम आणि राजस्थानमधील मतपेट्या स्वतंत्र विमानाने येथे आणण्यात आल्या.

केंद्रीय मंत्र्यांसह सनी देओल राष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानाला गैरहजर; कारण
बाळासाहेबांनी रामदास कदमांसाठी गडकरींकडे शब्द टाकला आणि भाजप झुकली!

निवडणूक आयोगाने सांगितले की, सोमवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत संसद भवन आणि राज्य विधानसभेच्या ३० केंद्रांसह ३१ ठिकाणी मतदान झाले. 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक मतपेटीला 'मिस्टर बॅलेट बॉक्स' या नावाने ई-तिकीट दिले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com