'जावेद हबीबचे सर्व सलून 48 तासांत बंद करा नाहीतर...'

व्हिडीओवरुन वादात अडकलेल्या जावेद हबिब यांच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ होणार
'जावेद हबीबचे सर्व सलून 48 तासांत बंद करा नाहीतर...'

हेअरस्टायलिस्ट जावेद हबिब (celebrity hairstylist Jawed Habib ) यांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्यांच्या या व्हिडीओवरुन त्यांच्यावर बरीच टीका होत आहे. या व्हिडिओत हेअर कटींग करताना जावेद हबीब यांनी थुंकीचा वापर केला होता. त्यानंतर नेटकऱ्यांनी हबीब यांच्या या कृत्यावर आक्षेप घेतला होता. सध्या या व्हिडीओवरुन वादात अडकलेल्या जावेद हबिब यांच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ होणार आहे. युपी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असतानाच, आता इंदूरचे भाजपा आमदार आकाश विजयवर्गीय (bjp mla Akash Vijayvargiya) यांनी इंदूरमध्ये जावेद हबीब चालवणारे सर्व सलून ४८ तासांच्या आत बंद करण्याचा इशारा दिला. असे न केल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Summary

इंदूरचे भाजपा आमदार आकाश विजयवर्गीय यांनी जावेद हबीब चालवणारे सलून ४८ तासांच्या आत बंद करण्याचा इशारा दिला आहे.

आमदार आकाश विजयवर्गीय यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत जिल्हाधिकारी मनीष सिंह, आयुक्त प्रतिभा पाल, पोलीस आयुक्त हरी नारायणचारी मिश्रा, मनीष कपुरिया या इंदूरमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांना विजयवर्गीय यांनी निवेदन दिले आहे. यात ते म्हणतात, अलीकडेच मी जावेद हबीब यांचा व्हिडिओ पाहिला. ज्यात त्यांनी एका महिलेला स्टेजवर आमंत्रित केले आणि केशरचना करताना तिच्या डोक्यावर थुंकले. मी याचा तीव्र विरोध करतो आणि तुम्हा सर्वांना विनंती करतो की, किमान इंदूरमध्ये तरी जावेद हबीबच्या नावाने चालणाऱ्या सर्व संस्था ४८ तासांच्या आत बंद कराव्यात. इंदूरमध्ये आम्ही त्यांच्या संस्था चालू देणार नाही अशी प्रतिज्ञा यावेळी त्यांनी घेतली.

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये पोलिसांनी जावेद हबीब विरोधात गुन्हा नोंदवला आहे. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. बरौत शहरातील रहिवासी पूजा गुप्ता यांच्या तक्रारीवरून मन्सूरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

'जावेद हबीबचे सर्व सलून 48 तासांत बंद करा नाहीतर...'
जिल्हा बँकेनंतर आता राजेंद्र पाटील-यड्रावकरांचे लक्ष पालिकेवर

दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाने (The National Commission for Women) आता या व्हिडीओची दखल घेतली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com