Jawed Habib यांचा माफीनामा; सांगितलं केसावर थुंकण्याचं कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jawed Habib
Jawed Habib यांचा माफीनामा; सांगितलं केसावर थुंकण्याचं कारण

Jawed Habib यांचा माफीनामा; सांगितलं केसावर थुंकण्याचं कारण

जावेद हबीब (Jaweb Habib) यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर जावेद हबीब विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात होता. हेअर कटींग करताना जावेद हबीब यांनी थुंकीचा वापर केला होता. त्यानंतर नेटकऱ्यांनी हबीब यांच्या या कृत्यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता त्यांनी स्पष्टीकरण देत माफी (Jawed Habib Apologize) मागितली आहे. तसेच हे का केलं जातं त्यांचं कारणंही सांगितलं.

हेही वाचा: पाकिस्तानी खासदाराचं रवीनाला चँलेज, दाखव माझ्यासारखं नाचून...

हेअरस्टायलिस्ट जावेद हबिब (celebrity hairstylist Jawed Habib ) यांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्यांच्या या व्हिडीओवरुन त्यांच्यावर बरीच टीका होत आहे. सध्या या व्हिडीओवरुन वादात अडकलेल्या जावेद हबिब यांच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच त्यांनी आता माफी मागितली असून, आम्ही प्रोफेशनल हेअर कट करतात मोठं मोठं सेशन करत असतो. त्या दरम्यान, हे सगळं केलं जातं. तरी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफ करा असं त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: 'वंदे मातरम' नव्हतं सोपं कारण... ए. आर. रहमाननं सांगितला किस्सा

दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाने (The National Commission for Women) आता या व्हिडीओची दखल घेतली असून त्यासंदर्भात कारवाईची मागणी करणारं पत्र देखील लिहलं आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top