'कोरोनाने माझ्या मतदारसंघात घुसून दाखवावं'; भाजप आमदाराचं थेट कोरोनाला चॅलेंज!

वृत्तसंस्था
Friday, 6 March 2020

बेताल वक्तव्य करणारे गुर्जर हे एकमेव भाजप आमदार नाहीत. त्यांच्या आधी आसाममधील भाजप आमदार सुमन हरिप्रिया यांनीही असेच बेताल वक्तव्य केले होते.

गाझियाबाद : देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने आपापल्या परीने उपाययोजना केल्या आहेत. इराणमधून गाझियाबादमध्ये परतलेल्या एका व्यक्तीला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आता तेथील भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने डायरेक्ट कोरोना व्हायरसलाच चॅलेंज केलं आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

या भाजप आमदाराचे नाव नंद किशोर गुर्जर असे असून कोरोनामध्ये हिंमत असेल तर लोणीमध्ये (आमदार गुर्जर यांचा मतदारसंघ) घुसून दाखवावं, असं अजबगजब चॅलेंज कोरोनाला दिलं आहे. एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी फोनवरून दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे. ज्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होऊ लागली आहे. 

- कोरोना संदर्भात ओबामांचा अनोखा सल्ला; पाहा काय म्हणाले!

माझा मतदारसंघ असलेल्या लोणीमध्ये रामराज्य आहे. इथे ९ गोशाळा आहेत. तसेच स्थानिक लोक धर्म-कर्म या गोष्टींबाबत जागरूकही आहेत. जिथे गाईचे वास्तव्य आहे, तिथे कोणताच व्हायरस येऊ शकत नाही. तो व्हायरस मनुष्यरुपात असो किंवा इतर कोणत्याही जर माझ्या मतदारसंघातील नागरिकांना अशा कोणत्या व्हायरसने त्रास दिला तर त्याला आम्ही पुरून उरू. लोणीमधील कोणालाही कोरोना व्हायरसची लागण होणार नाही, याची जबाबदारी माझी आहे, असं गुर्जर यांनी म्हटले आहे. 

- संसदेत आत आणि बाहेरही गोंधळ; जिवंत काडतुसे नेणाऱ्यास पकडले!

असे बेताल वक्तव्य करणारे गुर्जर हे एकमेव भाजप आमदार नाहीत. त्यांच्या आधी आसाममधील भाजप आमदार सुमन हरिप्रिया यांनीही असेच बेताल वक्तव्य करत नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण केला होता. गोमूत्र आणि शेणामुळे कोरोना व्हायरस बरा होऊ शकतो, असे हरिप्रिया यांनी म्हटले होते.

- देशात कोरोनाचा विळखा घट्ट; दिल्लीतील शाळांना सुटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MLA of Loni Vidhan Sabha constituency Nandkishor Gurjar challenged to coronavirus