वरुण गांधींना कोरोनाची लागण; म्हणतात, 'उमेदवार अन् कार्यकर्त्यांना बूस्टर डोस द्या' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

varun gandhi

भाजपचे खासदार वरुण गांधी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरून दिली आहे.

वरुण गांधींना कोरोनाची लागण; म्हणतात, 'उमेदवार अन् कार्यकर्त्यांना बूस्टर डोस द्या'

नवी दिल्ली - कोरोनाच्या (Corona) तिसऱ्या लाटेत आता अनेक नेतेमंडळींना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे (Corona Vaccine) दोन्ही डोस घेतल्यानंतरही आता अनेकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. भाजपचे (BJP) खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. त्यांनी म्हटलं की, माझ्यामध्ये कोरोनाची गंभीर लक्षणे दिसत आहेत. तीन दिवस पिलीभीत दौऱ्यावर होतो, त्यावेळी कोरोनाची लागण झाली असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

वरुण गांधी यांनी सोशल मीडियावरून माहिती देताना असंही म्हटलं की, निवडणूक आयोगाने उमेदवार आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनासुद्धा कोरोना लशीचा Precaution Dose द्यावा. तिसऱ्या लाटेच्या मध्यावर आपण आहे आणि सध्या निवडणूक प्रचार मोहिमसुद्धा सुरु आहे. त्यामुळे उमेदवार आणि कार्यकर्त्यांसाठी Precaution डोसची सोय करायला हवी.

हेही वाचा: कोरोना : संसदेतील 400 कर्मचारी, सर्वोच्च न्यायालयाचे 4 जज पॉझिटिव्ह

भारतातील कोरोना बाधितांची संख्या एका दिवसात दीड लाखाने वाढली आहे. गेल्या २४ तासात देशात १ लाख ५९ हजार ६३२ नवे रुग्ण सापडले. गेल्या २२४ दिवसातील ही सर्वात मोठी संख्या ठरली. सक्रीय रुग्णांची संख्या यामुळे ५ लाख ९० हजार ६११ इतकी झाली आहे. तर गेल्या २४ तासात ३२७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Indiavarun gandhi
loading image
go to top