
Satish Kaushik Spouse : कोण आहेत सतीश कौशिकच्या पत्नी शशी कौशिक, बॉलीवुडमध्येही करते काम
Satish Kaushik Spouse : बॉलीवुडचे फेमस अभिनेते आणि डायरेक्टर सतीश कौशिक यांचं बुधवारी निधन झालं. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने संपुर्ण बॉलीवूड हादरलं. 66 वर्षीय सतीश कौशिक यांचं हार्ट अटॅकनी निधन झालं. त्यांचे मित्र अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर याविषयी माहिती दिली.
सतीश कौशिक यांच्या निधनाने त्यांच्या कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. त्यांचा एक मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे. सतिश हे असं अचानक सोडून गेल्याने त्यांच्या पत्नी शशी कौशिक यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता.
शशी कौशिक कोण आहेत आणि सतिश आणि शशी यांची संघर्षमय कहानी कशी होती, हे आज आपण जाणून घेणार आहोत. (Satish Kaushik Spouse shashi kaushik life story work in bollywood)
कोण आहे शशी कौशिक?
सतीश कौशिकसोबत त्यांची पत्नी शशी कौशिकही बॉलीवुड प्रोड्यूसर आहे. शशी कौशिकने 'छोरियां छोरों से कम नहीं होती' हा चित्रपट प्रोड्यूस केला होता ज्यामध्ये सतीश कौशिक यांनी सुद्धा अभिनेता म्हणून काम केले होते.
याशिवाय शशि कौशिक यांच्यासोबत पंकज त्रिपाठी स्टारर चित्रपट 'कागज' या चित्रपटाच्या को-प्रोड्यूसरही राहल्या आहेत पण त्या सतिश यांच्यासारख्या पॉपूलर नाही.
सतिश आणि शशी यांचा विवाह १९९५ मध्ये झाला होता. मात्र त्यांना नऊ वर्षापर्यंत मुलबाळं नव्हते. लग्नाच्या 9 वर्षानंतर त्यांना 1994 मध्ये शानू नावाच्या मुलगा झाला. मात्र दुर्दैवाने वयाच्या दुसऱ्या वर्षीच मुलाचं निधन झालं. हा कौशिक कुटूंबासाठी खूप मोठा धक्का होता.
मुलाच्या निधनानंतर जवळपास 16 वर्षानंतर त्यांच्या घरी एका मुलीने जन्म घेतला. विशेष म्हणजे सरोगेसीद्वारा शशी आणि सतीश मुलीचे आईवडिल बनले.
एक वेळ अशी होती की सतीश कौशिक यांची नीना गुप्ता यांच्यासोबत लग्न करण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी नीना गुप्ता यांना प्रपोजही केले होते. मात्र त्यांनी लग्न केले नाही पण त्यांची मैत्री शेवट पर्यंत कायम होती.
सतीश कौशिकने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते की नीना गुप्ताला लग्नाचं प्रपोज केले होते ही गोष्ट मी माझ्या बायकोला म्हणजेच पत्नी शशीलाही सांगितली होती. शशीला सतिश आणि नीना यांच्या इक्वेशनविषयी चांगलं माहिती होतं. नीना त्यांच्या घरी यायची. शशी ही सतिश आणि नीनाच्या मैत्रीलासमजायची आणि नीनाचा आदरही करायची. शशी एक उत्तम पत्नी होती.