स्नेहा काळजी घे, जास्त रडू नकोस...

वृत्तसंस्था
Tuesday, 11 February 2020

मैत्रिणीसोबत मध्यरात्री पर्यंत चॅटींग करत बसला. स्नेहा काळजी घे आणि जास्त रडू नकोस, असा मेसेज पाठवून प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येथे घडली.

पाटना (बिहार): मैत्रिणीसोबत मध्यरात्री पर्यंत चॅटींग करत बसला. स्नेहा काळजी घे आणि जास्त रडू नकोस, असा मेसेज पाठवून प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येथे घडली.

विमानाने येऊन प्रेयसीला चॉकटेल देत लगावली थप्पड...

किशन मिश्रा (वय 21) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तो बनारस हिंदू विश्वविद्यालयात शिक्षण घेत होता. व्हॅलेंटाइन आठवड्यामध्ये प्रियकराने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. मात्र, किशनच्या वडिलांनी खूनाचा संशय व्यक्त केला आहे.

विवाहानंतर पाचव्याच दिवशी महिलेचे जुळले सुत अन्...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखासन गावामध्ये राहणारे संतोष मिश्रा यांचा किशन हा एकुलता एक मुलगा होता. तो पदवीचे शिक्षण घेत होता. घरामध्ये त्याचा मृतदेह आढळून आल्यामुळे तक्रार दाखल झाली होती. तपासादरम्यान त्याचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला. मोबाईलवरून तो मध्यरात्रीपर्यंत स्नेहा (काल्पनीक नाव) नावाच्या मुलीसोबत चॅटींग करत होता. स्नेहा काळजी घे, जास्त रडू नकोस... असा त्याचा शेवटचा मेसेज आहे. यावरून त्याने आत्महत्या केली असावी, असा संशय आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.

अलविदा दुनिया, हमेशा के लिए...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boyfriend hanged himself in valentines week in bihar