esakal | माझी होणारी बायको पळाली; मी काय करू...
sakal

बोलून बातमी शोधा

bride escaped with lover before marriage at uttarakhand

दोघांच्या विवाहाची जोरदार तयारी झाली होती. विवाहाचा मुहुर्त काही मिनिटांवर येऊन पोहचला असतानाच नवरी प्रियकरासोबत पळून गेली. या घटनेनंतर नवरा म्हणाला, आता मी काय करू....

माझी होणारी बायको पळाली; मी काय करू...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

काशीपूर (उत्तराखंड): दोघांच्या विवाहाची जोरदार तयारी झाली होती. विवाहाचा मुहुर्त काही मिनिटांवर येऊन पोहचला असतानाच नवरी प्रियकरासोबत पळून गेली. या घटनेनंतर नवरा म्हणाला, आता मी काय करू....

व्हिडिओ पाहून डोळ्यात येतं फक्त पाणीच...

अजमेर (राजस्थान) येथील युवतीचा काशीपूर येथील युवकासोबत विवाह ठरला होता. विवाहाची तयारी मोठ्या उत्साहात सुरू होती. दोन्ही कुटुंबातील नातेवाईक दोन दिवसांपासूनच कार्यालयात होते. मेंहदी व हाळदीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. दोन्ही कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण होते. विवाहाचा दिवस उजाडल्यानंतर विवाहाची तयारी सुरू होती. नवरा व नवरदेवाने नवीन कपडे घातले होते. नवरदेवाची घोड्यावरून वरात काढण्यात आली. विवाहाला काही वेळ शिल्लक असताना नवरीने धूम ठोकली.

पत्नीला प्रियकराच्या मिठीत पाहिलं अन् केला स्फोट...

नवरदेव मंडपस्थळी येऊन उभा राहिल्यानंतर नवरीला बोलावण्यात आले. परंतु, बराच वेळ ती न आल्याने शोध घेतला असता ती प्रियकरासोबत पळून गेल्याचे समजले. दोन्ही कुटुंबियांमध्ये जोरदार वादावादी झाली. अखेर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले. नवरदेवाने कपडे काढले आणि फेकून देत मी काय करू म्हणायला लागला. अखेर, नवरदेवाच्या कुटुंबियांनी परतीचा मार्ग धरला...

मुलाच्या प्रेयसीवर गेली बापाची वाईट नजर अन्...