Buddha Jayanti 2022: बुद्धांनी असं काय पाहिलं की राजेशाही, बायको-मुलगा अन् संपत्तीचा त्याग केला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gautam Buddha

बुद्धांनी असं काय पाहिलं की राजेशाही, बायको-मुलगा अन् संपत्तीचा त्याग केला

वैशाख महिन्यातील पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता. यालाच बुद्ध जयंती असे सुद्धा म्हणतात. याच दिवशी गौत बोधगया . येथील बोधी वृक्षाखाली बसून भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती , असे म्हटले जाते. भगवान बुद्धांचे बालपणीचे नाव सिद्धार्थ गौतम होते. ते राजा शुद्धोदनाचा पुत्र होते.त्यांचा राजाचा पुत्र ते बुद्ध हा प्रवास फारच रोमांचक आहे. (Buddha purnima 2022 )

एकदा राजाचा पुत्र सिद्धार्थ गौतमने असे दृश्य पाहिले की त्यानंतर त्यांनी आपली पत्नी, मूल, राजेशाही, संपत्तीसह सर्व काही सोडून संन्यासी झाले. यानंतर सिद्धार्थ गौतम यांनी घोर तपश्चर्या करून ज्ञान प्राप्त केले आणि ते महात्मा बुद्ध झाले. या महान बुद्धांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. (Life story of Lord Buddha)

हेही वाचा: Buddha Purnima 2022 Date : या दिवशी साजरी होणार बुद्ध पौर्णिमा; जाणून घ्या महत्त्व

सिद्धार्थ यांचा जन्म लुंबिनी (सध्याचे नेपाळ) येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव राजा शुद्धोदन आणि आईचे नाव माया होते. सिद्धार्थ यांच्या जन्मानंतरच त्यांची आई वारली. असे म्हणतात की एका तपस्वीने शुद्धोदनाला सांगितले होते की सिद्धार्थ मोठा होऊन सर्व जगाचे कल्याण करेल. हे पाहून शुद्धोदनाला काळजी वाटू लागली.

त्यांना वाटले की सिद्धार्थ संन्याशाच्या मार्गाने गेला तर त्याचे राज्य कोण सांभाळणार. त्यामुळे शुध्दोधनाने सिद्धार्थ यांचे चांगले संगोपन केले. त्यांना कसलीही वेदना जाणवू दिली नाही. त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या. त्यांनी सिद्धार्थाला सर्व जगापासून लपवून ठेवले. मोठे होईपर्यंत सिद्धार्थ यांना सांसारिक दु:खाची जाणीव नव्हती.

वयाच्या सोळाव्या वर्षी सिद्धार्थ यांचा विवाह यशोधराशी झाला. राजा शुद्धोधनाने सिद्धार्थला अनेक आलिशान राजवाडे भेट दिले. त्यांच्या वाड्यांमध्ये हजारो नोकर-दासी काम करायच्या. त्यांच्याकडे उपभोग व चैनीच्या सर्व सोयी होत्या. पुढे सिद्धार्थ यांची पत्नी यशोधरा हिने एका मुलाला जन्म दिला.

हेही वाचा: Buddha Jayanti 2021: पिंपळाच्या पानावर साकारली गौतम बुद्धांची रांगोळी

असेच एका दिवशी सिद्धार्थ आपल्या रथात फिरायला गेले. त्याआधी ते कधीच एकटेच बाहेर फिरायला गेले नव्हते. जेव्हा सिद्धार्थचा रथ बाजारातून बाहेर पडला तेव्हा सिद्धार्थला एक वृद्ध व्यक्ती दिसली. त्याची कंबर पूर्णपणे वाकलेली होती. चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या. आणि मोठ्या कष्टाने तो उभा राहण्याचा प्रयत्न करत होता. हे पाहून सिद्धार्थ यांचे मन अस्वस्थ झाले.त्यांनी आपल्या सारथीला विचारले की तो माणूस असा का आहे? तेव्हा सारथीने सांगितले की तो वृद्ध झाला आहे, त्यामुळे त्याचे शरीर आता त्याला साथ देत नाही. म्हातारपण हे जीवनाचे कटू वास्तव आहे. आपणही एक दिवस म्हातारे होऊ.

हेही वाचा: भाईचारा! हनुमान जन्मोत्सव...महापंगतीसाठी मुस्लिम बांधवांनी घेतला पुढाकार

रथ थोडा पुढे सरकला तेव्हा सिद्धार्थ यांना एक आजारी व्यक्ती दिसली. त्याला श्वास घेण्यासही त्रास होत होता. तो जीवन-मृत्यू यांच्यात संघर्ष करत होता. सारथीने सिद्धार्थ यांना सांगितले की आपले शरीर नश्वर आहे. काही काळानंतर ते सहकार्य करत नाही आणि माणूस आजारी पडू लागतो आणि नंतर मृत्यूला प्रिय होतो.

पुढे गेल्यावर सिद्धार्थ यांना एक प्रेत यात्रा दिसली. एका मृतदेहाला चार जण खांदा देत होते. त्यांच्या मागून काही माणसं चालत होती, जे ओरडत होते. सारथीने सिद्धार्थ यांना सांगितले की मृत्यू हे आपल्या जीवनातील आणखी एक कटू सत्य आहे. माणसाचा मृत्यू निश्चित आहे.

सर्व दृश्य पाहून सिद्धार्थच्या मनात खळबळ निर्माण झाली. जीवनाचे असे पैलू त्यांनी यापूर्वी कधीच जाणवले नव्हते. त्यांच्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले. सिद्धार्थ यांना वाटले की हे कसे जीवन आहे. सिद्धार्थ यांचा रथ थोडा पुढे सरकला तेव्हा एक संन्यासी तिथून जात होता. सिद्धार्थची नजर त्या साधूवर पडली. साधूच्या चेहऱ्यावर वेगळाच प्रकाश पडला. चेहऱ्यावर हसू उमटले. जणू त्याला आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या दुःखाची भीती नव्हती. सिद्धार्थ यांना त्याचं उत्तर मिळालं. त्यांनी संन्यासी होण्याचे ठरवले.

हेही वाचा: Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022: ‘या’ अभिनेत्यांनी पडद्यावर साकारली महाराजांची भूमिका

सिद्धार्थ आपल्या महालात गेले आणि पत्नी आणि मुलासह सर्व प्रकारची संपत्ती, राजेशाही, भोग आणि विलास सोडला. त्यावेळी सिद्धार्थ अवघे 27 वर्षांचे होते. ते अनेक ठिकाणी फिरले आणि घोर तपश्चर्या केली. वयाच्या ३५ व्या वर्षी त्यांनी बोधगया (सध्याचे बिहार) येथील बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्त केले. अशा प्रकारे ते सिद्धार्थ गौतमापासून महात्मा बुद्ध झाले. वाराणसीजवळ सारनाथ नावाच्या ठिकाणी त्यांनी पहिला उपदेश दिला.

Web Title: Buddha Purnima 2022 Life Story Of Lord Buddha

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top