Corona Effect : रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय; 'या' तिकिटांच्या दरांत वाढ!

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 मार्च 2020

नवी दिल्ली : देशात कोरोनाने थैमान घातल्यामुळे देश लॉक डाऊनच्या दिशेने निघाला आहे. अनेक राज्यांनी आपापल्या राज्यात कोरोनाला आळा घालण्यासाठी अनेक कठोर पावले उचलली आहेत. त्या पाठोपाठ आता मध्य रेल्वेनेही कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

नवी दिल्ली : देशात कोरोनाने थैमान घातल्यामुळे देश लॉक डाऊनच्या दिशेने निघाला आहे. अनेक राज्यांनी आपापल्या राज्यात कोरोनाला आळा घालण्यासाठी अनेक कठोर पावले उचलली आहेत. त्या पाठोपाठ आता मध्य रेल्वेनेही कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मध्य रेल्वेने महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, भुसावळ आणि सोलापूर विभागातील प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर पुढील आदेश येईपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आता प्लॅटफॉर्म तिकीटासाठी ५० रुपये आकाराले जाणार आहेत. पूर्वी 10 रुपये तिकीट दर आकारला जात होता. मात्र, रेल्वे प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

- राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील सर्व निवडणूक प्रक्रिया स्थगित

दरम्यान, राज्य सरकार आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लोकांना कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये, यासाठी गर्दी होईल, अशा ठिकाणी जाण्यास मज्जाव घातला आहे. मात्र, याकडे नागरिक साफ दुर्लक्ष करताना दिसत आहे. मध्य रेल्वे नंतर पश्चिम रेल्वेनेही मुंबई, वडोदरा, अहमदाबाद, रतलाम, राजकोट आणि भावनगर या रेल्वे स्थानकांसाठी प्लॅटफॉर्मच्या तिकिटाचे दर ५० रुपये केले आहे.

- Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घेतला मोठा निर्णय!

लांब पल्ल्याच्या गाड्यांना स्थगिती

तसेच मध्य रेल्वेने ३१ मार्चपर्यंत लांब पल्ल्याच्या २२ गाड्या काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मुंबई-पुणे दरम्यान धावणारी डेक्कन एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस, नागपूर हमसफर एक्सप्रेस आणि प्रगती एक्सप्रेसचा समावेश आहे. यासोबत पुणे हमसफर, हैदराबाद इंटरसिटी आणि दुरांतो एक्सप्रेसला स्थगिती देण्यात आली आहे. 

- खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण; नवे दर...

तत्पूर्वी, मंगळवारी (ता.१७) देशात कोरोना व्हायरसची १२ नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आता देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १२६ वर पोचली आहे. सोमवारपर्यंत (ता.१६) देशात ११४ रुग्ण असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Central railway increases platform ticket from Rs 10 to Rs 50 amid Coronavirus