Corona : मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून मोठी मदत जाहीर!

वृत्तसंस्था
Saturday, 14 March 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविरूध्दची लढाई लढण्यासाठी सार्क देशानी एकजूट करावी, असे आवाहन केले आहे. 

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली व महाराष्ट्रासह १५ राज्यांत हातपाय पसरलेल्या, दोन जणांचा बळी घेतलेल्या कोरोना या विषाणूच्या साथीला केंद्र सरकारने शनिवारी (ता.१४) राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित केले. कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ९१ वर पोहोचली आहे. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या आप्तांना प्रत्येकी ४ लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा केंद्राने केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पुन्हा ट्‌विट करून, ‘कोरोनाशी एकजुटीने लढूया’ असे देशवासीयांसह सार्क राष्ट्रांनाही आवाहन केले. 

कोरोनामुळे कर्नाटक व दिल्लीत दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पंजाबमध्ये विदेशातून परतलेल्या तब्बल सहा हजाराहून जास्त लोकांना देखरेखीखाली विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. दिल्लीत काल रात्री मृत्यू झालेल्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यास निगमबोध घाट स्मशानभूमीच्या अधिकाऱ्यांनी आज प्रथम परवानगी नाकारली. नंतर विद्युतदाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

- १८ रुपयांचं पेट्रोल तुम्हाला मिळतं ७५ रुपयांना; पण कसं? जाणून घ्या!

आतापवेतो १५ राज्यांत कोरोना पसरला असून केरळपाठोपाठ महाराष्ट्रात सर्वाधिक २६ जणांना कोरोनाची लागण झाल्याची अधिकृत आकडेवारी आहे. उत्तर प्रदेशात कोरोनाची लागण झालेल्या गाझियाबादेतील पितापुत्रांना तसेच आणखी तिघांना गांधी रूग्णालयात दाखल केल्याचे जिल्हा प्रशासनाने आज सांगितले. गोव्यातही पर्यटकांची वर्दळ असलेले कॅसीनो, बोट बार, डान्स बार ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आले आहेत. 

- कोरोनाच्या धास्तीमुळे RSS ने घेतला महत्त्वाचा निर्णय!

कोरोनाची धास्ती 

- सर्वोच्च न्यायालयात केवळ अत्यावश्‍यक खटल्यांचीच सुनावणी 
- तिहारमध्ये सर्व कैद्यांची तत्काळ आरोग्य तपासणी 
- इटलीतून २१ भारतीयांना घेऊन येणारे एअर इंडियाचे विमान आज कोची विमानतळावर पोहोचले. 
- बंगळूरमधील इन्फोसिसचे सॅटेलाइट कार्यालय बंद 
- आयआयटीच्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत रद्द 

- Coronavirus : सावधान! आदेशाचे उल्लंघन केल्यास खावी लागणार जेलची हवा

मोदींचे आवाहन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविरूध्दची लढाई लढण्यासाठी सार्क देशानी एकजूट करावी असे आवाहन केले आहे. मोदींच्या आवाहनला प्रतिसाद देताना नेपाळ, अफगानिस्तान, श्रीलंका, मालदीव, बांग्लादेश व भूतानसह पाकिस्ताननेही मान्यता दिली आहे. सार्क राष्ट्रप्रमुखांशी पंतप्रधान मोदी येत्या एक दोन दिवसांत व्हिडीओ कॉन्परन्सच्या माध्यमातून चर्चा करण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Centre withdraws Rs 4 lakh ex gratia for families of coronavirus victims