हवेच्या प्रदूषणामुळे गुदमरतोय बालजीव

वृत्तसंस्था
Sunday, 25 October 2020

भारतात बालमृत्यूच्या विविध कारणांमध्ये हवेचे प्रदूषण हे एक महत्त्वाचे कारण आहे. गेल्या वर्षी भारतात १.१६ लाख लहान मुलांचा बळी प्रदूषणामुळे गेला आहे, असा दावा अमेरिकेतील एका विचार गटाने केला आहे. हवेतील विषारी घटकांमुळे जगभरात पाच लाख लहान मुलांचा मृत्यू झाला आहे.

भारतात गेल्या वर्षी १.१६ लाख मुलांचा मृत्यू; अमेरिकेतील अभ्यासकांचा दावा
नवी दिल्ली - भारतात बालमृत्यूच्या विविध कारणांमध्ये हवेचे प्रदूषण हे एक महत्त्वाचे कारण आहे. गेल्या वर्षी भारतात १.१६ लाख लहान मुलांचा बळी प्रदूषणामुळे गेला आहे, असा दावा अमेरिकेतील एका विचार गटाने केला आहे. हवेतील विषारी घटकांमुळे जगभरात पाच लाख लहान मुलांचा मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हवेच्या प्रदूषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूंचे विश्‍लेषण करणारा हा पहिला अहवाल आहे. गेल्या वर्षी जगात ६६.७ लाख लोकांच्या मृत्यूला हवेचे प्रदूषण कारणीभूत आहे, असे यात नमूद केले आहे. हवेतील पीएम २.५ कणांमुळे (२.५ मायक्रॉनपेक्षा कमी आकाराचे कम) बालकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण निम्मे आहे. श्‍वसनाशी संबंधित ‘क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव पल्मनरी डिसिज’ (सीओपीडी), मधुमेह, हृदय रोग, तीव्र श्‍वसन संक्रमण (एलआरआय) अशा आजारांमधील मृत्यूतही हवेचे प्रदूषण कारणीभूत असते.

भाजपने दोन विद्यमान आमदारांसह 7 जणांची केली हकालपट्टी

अकाली जन्म
बालकांचे सर्वाधिक मृत्यू हे जन्माच्या वेळी वजन कमी असणे किंवा अकाली जन्म झाल्याने होतात. याचे प्रमुख कारण गर्भवती महिला विषारी हवेच्या संपर्कात आल्याने ही वेळ ओढवू शकते, असा दावा, अहवालात करण्यात आला आहे. मात्र याचे जैविक कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरीही ज्याप्रमाणे मातेच्या धूम्रपानामुळे बाळाचे वजन कमी भरण्याबरोबरच अकाली जन्म होतो, त्याचप्रमाणे हवेच्या प्रदूषणाचा परिणाम त्यावर होतो, असे या अभ्यासात म्हटले आहे.

कोरोनाबाधित महिलेला बेडला बांधून घातलं; काँग्रेसने केली कारवाईची मागणी

अकाली मृत्यू
अकाली मृत्यूची कारणांमध्ये हवेच्या प्रदूषणाचे कारण चौथ्या क्रमांकावर आहे. विषारी हवेचा संबंध हृदय व फुप्फुसांशी संबंधित आजारांशी आहे, यात काहीही वाद नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तज्ज्ञांचा हा खुलासा चिंताजनक आहे.कारण हवेच्या प्रदूषणामुळे कोरोनाव्हायरसचा धोका जास्त वाढू शकतो.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Childhood suffocates due to air pollution