esakal | भारत-चीन सीमेवरचा खरा व्हिलन कोण? अमेरिकन गुप्तचर संस्थेचा खळबळजनक दावा
sakal

बोलून बातमी शोधा

india china border

भारत आणि चीन सीमेवर झालेल्या संघर्षानंतर संबंधित प्रकाराला जबाबदार कोण किंवा यामागे कोणाचा हात होता यावर अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने खळबळजनक दावा केला आहे.

भारत-चीन सीमेवरचा खरा व्हिलन कोण? अमेरिकन गुप्तचर संस्थेचा खळबळजनक दावा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - भारत आणि चीन सीमेवर झालेल्या संघर्षानंतर संबंधित प्रकाराला जबाबदार कोण किंवा यामागे कोणाचा हात होता यावर अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने खळबळजनक दावा केला आहे. अमेरिकन गुप्तचर विभागाने केलेल्या दाव्यानुसार चीनकडून भारतीय सैनिकांवर हल्ला करण्याचे आदेश देण्यात आले होते आणि  ही घटना एक पूर्वनियोजीत कटाचा भाग होती असंही म्हटलं आहे. यामध्ये सर्वात मोठी भूमिका चीनचे जनरल झाओ जोंग की यांची होती. ते वेस्टर्न कमांड थिएटरचे प्रमुख आहेत. त्यांनी चीनी सेनेला गलवान खोऱ्यात हल्ला करण्याचे आदेश दिले होते. जनरल झाओ जोंग की ने आधीही भारताविरुद्ध संघर्ष निर्माण करण्यासाठी कुरापती केल्या आहेत. भारताची अमेरिकेसोबत असलेली जवळीकता खूपत असल्यानं धडा शिकवण्यासाठी जनरल झाओ जोंग की ने असं केल्याचं म्हटलं जात आहे. 

गलवान खोऱ्यात अखेर सैन्य मारले गेल्याची चीनची कबुली

चीनचा हा डाव मात्र त्यांनाच अंगलट आला. गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान हुतात्मा झाले तर चीनचे 43 सैनिक मारले. 15 जूनला रात्रीच्या सुमारास लडाखमधील गलवान खोऱ्यात दोन्ही देशांचे सैनिक आमने सामने आले. त्यावेळी चीनी सैनिकांनी अचानक हल्ला केला. भारताच्या हद्दीत चीनी सैनिकांनी उभारलेले तंबू काढलेत की नाही याची पाहणी करण्यासाठी बिहार रेजिमेंटचे कर्नल संतोष बाबू यांच्या नेतृत्वाखाली काही जवान गेले होते. त्यावेळी तिथं असलेल्या चीनी सैनिकांनी भारतीय जवानांवर हल्ला केला. 

अमेरिकेनंतर ब्राझील बनतोय कोरोनाचा हॉटस्पॉट; मृतांची संख्या झाली एवढी

दोन्ही देशांमधील करारानुसार सैनिक आमने सामने आल्यानंतर गोळीबार झाला नाही. मात्र चीनी सैनिकांनी खिळे असलेल्या काठी, रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात अनेक भारतीय जवान जखमी झाले तसेच त्यांनी नदीतही ढकलण्यात आले. कर्नल संतोष बाबू यांच्यासह 20 जवान यामध्ये हुतात्मा झाले. भारताने चीनचे 40 हून अधिक सैनिक मारल्याचा दावा केला आहे मात्र चीनकडून अद्याप त्याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.

बॉयकॉट चायनीज प्रॉडक्ट मोहिमेचं चीनला मिरच्या झोंबल्या; वाचा चीनचा ग्लोबल टाईम्स काय म्हणतोय...

एक आठवड्यानंतर चीनने त्यांचे कमांडिग ऑफिसर मारले गेल्याचं स्वीकारलं. चीनकडून ही बाब दोन्ही देशांच्या लष्करी स्तरावर झालेल्या चर्चेवेळी मान्य करण्यात आली. सध्या या घटनेनंतर सीमेवर तणावाचे वातावरण आहे. गेल्या चार दशकापासून दोन्ही देशात असलेली शांतता यामुळे भंगली आहे. या घटनेनंतर भारतात चीनी वस्तूंवर बहिष्काराची मोहिमही सुरु करण्यात आली आहे. 

भारत-चीन संघर्षावर ट्रम्प यांचे वेट अँड वॉच 

सीमेवर भारतीय सैन्य अधिक सतर्क झाली आहे. सॅटेलाइट इमेजमधून धक्कादायक माहिती समोर आली होती. चीनकडून घुसखोरीचे प्रयत्न सातत्याने केले जात आहे. यामुळे भारताने हवाई दलालासुद्धा तैनात केलं आहे.