G-20 Summit: आधी पुतिन, आता क्षी जिनपिंग दिल्लीतील जी-२० संमेलनाला राहणार गैरहजर

modi and xi jinping
modi and xi jinpingSakal

Chinese President Xi Jinping is likely to skip a summit of G20 leaders in India next week

नवी दिल्ली- जी-२० संमेलन ९ आणि १० सप्टेंबर रोजी भारताची राजधानी दिल्ली येथे होणार आहे. या संमेलनासाठी जगभरातील नेते येत आहेत. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग या बैठकीला गैरहजर राहण्याची शक्यता आहे. रॉयटर्सने या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. जी-२० संमेलानाला चीनचे प्रमुख क्षी जिनपिंग उपस्थिती लावतील असं यापूर्वी सांगण्यात आलं होतं.

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन जी-२० संमेलनासाठी दिल्लीत येणार आहेत. त्यामुळे दिल्लीमध्ये क्षी जिनपिंग आणि ज्यो बायडेन यांची भेट होईल असं सांगण्यात येत होतं. दोन महासत्तांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि व्यापारासंबंधी या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता होती. बायडेन आणि जिनपिंग यांची याआधी मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात बाली येथे भेट झाली होती. त्यामुळे या ताज्या भेटीकडे सर्वांचे लक्ष होते.

modi and xi jinping
Citizenship: पाच वर्षात 8 लाख लोकांनी सोडलं भारतीय नागरिकत्व; चीन-पाकिस्तानलाही बनवताहेत घर

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी याआधी पंतप्रधान मोदी यांना दूरध्वनीवरुन संपर्क साधून जी-२० संमेलनाला येणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यांच्याऐवजी परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव येणार आहेत. त्यानंतर आता चीनचे अध्यक्षही या संमेलनाला दांडी मारण्याचे वृत्त आहे. चीनच्या सूत्रांनी जिनपिंग कोणत्या कारणासाठी दिल्लीत येण्यासाठी टाळत आहेत याबाबत काहीही सांगण्यास नकार दिलाय.

modi and xi jinping
Modi-Putin Talk: PM मोदी, पुतिन यांच्यात फोनवरुन चर्चा; 'या' महत्वाच्या विषयावर झाली चर्चा

ब्रिक्स BRICS बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्षी जिनपिंग याची भेट झाली होती. यावेळी त्यांच्यात काही मिनिटे चर्चाही झाली होती. सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोघांमध्ये चर्चा झाली होती. चीनने सोमवारी देशाचा नकाशा जाहीर केला होता. त्यात अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचं दाखवलं होतं. या घटनेचा भारताने स्पष्ट शब्दांत निषेध केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com