esakal | युपीत स्मशानं भरली, अंत्यसंस्कारांसाठी नव्या ठिकाणांचा शोध
sakal

बोलून बातमी शोधा

लखनऊ : उत्तर प्रदेशात कोरोनाचा मोठा उद्रेक झाला आहे. राज्यातील मोठ्या शहरांमधील स्माशनंही फुल्ल झाली असून मृतांचे कुटुंबीय आता अंत्यसंस्कारांसाठी मोकळ्या जागांचा शोध घेत आहेत.

युपीत स्मशानं भरली, अंत्यसंस्कारांसाठी नव्या ठिकाणांचा शोध

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

लखनऊ : उत्तर प्रदेशात सध्या कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक झाला असून माध्यमांमध्ये दिसून आलेल्या अंत्यसंस्कारांच्या फोटोंवरुन ही परिस्थिती समोर आली आहे. राजधानी लखनऊसह राज्यातील इतरही मोठ्या शहरांमधील स्माशनभूमींमध्ये मोठ्या प्रमाणावर मृतदेह दाखल होत असल्याने अंत्यसंस्कारांसाठी जागा उपलब्ध नाहीत. यासाठी अनेक तास वाट पहावी लागत असल्याने कुटुंबीय इतर ठिकाणी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा शोधत असल्याचं भयावह चित्र आहे.

हेही वाचा: कहर थांबेना! सलग तिसऱ्या दिवशी 2 लाखांहून अधिक रुग्ण

लखनऊ येथील गोमती नदीच्या किनाऱ्यावर लोकांनी अंत्यसंस्कार सुरु केले आहेत. याच ठिकाणी कोविडने मृत्यू झालेल्या मृतदेहांवरही अंत्यसंस्कार केले जात आहेत. मात्र, यावेळी कोरोनाच्या प्रोटोकॉलचे पालन होत नसल्याने अशा प्रकारे होत असलेल्या अंत्यसंस्कारांमुळं संसर्ग वाढण्याचा धोका कायम आहे.

हेही वाचा: कोरोना चाचणी करावी लागू नये म्हणून रेल्वे स्थानकाबाहेर लोकांची पळापळ

स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, या ठिकाणी कधीकाळी एखाद्या मृतदेहावर अंत्यसंस्कार व्हायचा. पण एक-दोन दिवसांपासून सकाळपासून रात्रीपर्यंत अनेक मृतदेहांना अग्नी दिला जात आहे. जवळच्या मंदिरातील एक पुजारी हा विधी करतात. यासाठी लाकडं जवळच्या वखारीतून आणले जातात. या मृतदेहांचे मृत्यू प्रमाणपत्र कसं तयार केलं जात यावर स्थानिकांनी सांगितलं की, स्थानिक नगरसेवक ते देण्याचं काम करतोय किंवा प्रतिज्ञापत्र तयार करुन देत आहे. या प्रतिज्ञापत्रावरुन महापालिकेतून प्रमाणपत्र दिलं जात आहे.

हेही वाचा: कुंभमेळ्यावरुन मुंबईत येणाऱ्यांना आयसोलेशनमध्ये ठेवणार - मुंबई महापौर

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी स्मशानात येणाऱ्या मृतदेहांचा आकडा गुरुवारी काही प्रमाणात कमी झाला होता, पण तोही १५० पार होता. शुक्रवारी रात्री सहा वाजेपर्यंत १७३ मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी शहरातील दोन प्रमुख स्माशनभूमीत आणण्यात आले होते. बैकुंठधाम आणि गुलाला घाटावर अंत्यसंस्कारांसाठी आलेल्या १७३ मृतदेहांमध्ये ६० मृतदेह कोरोनाबाधित होते.

नव्या स्मशानभूमी उभारणार

बैकुंठधामप्रमाणे गुलाला घाटावर दोन नव्या शवदाहिनी बनवल्या जाणार असून या घाटांवर तीन नव्या विद्युत शवदाहिन्याही बनवल्या जाणार आहेत. यांपैकी बैकुंठधामवर एक तर गुलाला घाटावर एक असणार आहे. यावरुन महापालिकेकडून टेंडरही काढण्यात आलं आहे. १५ ते २० दिवसांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.