

Abhijeet Dipke Police Detained
ESakal
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून राजधानी दिल्लीत शनिवारपासून केंद्रातील मोदी सरकार आणि 'जेन-झीं'ची कॉक्रोच जनता पार्टी यांच्यात संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. पोलिसांनी परवानगी नाकारूनही 'सीजेपी'ने जंतरमंतरवर आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे. अशातच अभिजित दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे. दिल्ली पोलिसांनी विमानातूनच त्यांना ताब्यात घेतलं असून 'आम्ही अटकेसाठीच येथे आलो आहोत' असे अभिजित दीपके यांनी म्हटले आहे.