

CJP Protest News
Esakal
CJP Protest: केंद्र सरकारकडून कॉकरोच जनता पार्टीची आणखी एक मोठी मागणी मान्य करण्यात आली आहे. बिहारप्रमाणेच दिल्ली आणि देशातील इतर राज्यांमध्येही आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यासंदर्भात सीजेपीचा प्रवक्ता सौरव दासने रात्री एक वाजता व्हिडीओच्या माध्यमातून मोठी माहिती दिली. त्याने म्हटलं की, सरकारकडून आश्वासन देण्यात आलंय की, बिहारप्रमाणे दिल्ली आणि इतर राज्यातील गुन्हेही मागे घेतले जातील. त्याची घोषणा मंगळवारी करण्यात येणार आहे.