CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड! अमित शाहांची धर्मेंद्र प्रधानांशी चर्चा; राजीनामा देणार? काय शिजतंय दिल्लीत?

CJP Parliament March: कॉकरोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांनी दावा केला की, दिल्ली पोलिसांनी अभिजीत दीपकेंना ताब्यात घेतले आहे. पोलीस शांततापूर्ण आंदोलकांवर निर्घृणपणे कारवाई करत असून त्यांना मारहाण करत आहेत.
Dharmendra Pradhan meets Amit Shah

Dharmendra Pradhan meets Amit Shah

ESakal

Updated on

पेपरफुटी प्रकरणी कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. सीजेपीने सोमवारी (२० जुलै) संसदेवर मोर्चा काढला आहे. ज्यामुळे सर्वत्र गदारोळ झाला. या गोंधळाच्या दरम्यान एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. धर्मेंद्र प्रधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी आले आहेत. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी संसद भवनात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com