ले. जनरलने केले कुत्र्याला सॅल्यूट, का ते पाहा... 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 डिसेंबर 2019

पंधरावे कोर कमांडर लेफ्टिनेंट जनरल केजेएस ढिल्लन यांचा जुलै महिन्यातला एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यात कमांडर ढिल्लन आणि एक कुत्रा एकमेकांना सॅल्यूट करताना दिसत आहेत.

श्रीनगर : बऱ्याचदा लष्करात खुप चांगल्या गोष्टी घडतात पण त्या बऱ्याचदा पुढे येत नाहीत. परंतू आता सोशल मिडीयामुळे बऱ्याच गोष्टी पुढे येत आहेत. पंधरावे कोर कमांडर लेफ्टिनेंट जनरल केजेएस ढिल्लन यांचा जुलै महिन्यातला एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

दरम्यान, या व्हायरल झालेल्या फोटोत कमांडर ढिल्लन आणि एक कुत्रा एकमेकांना सॅल्यूट करताना दिसत आहेत. शनिवारी हा फोटो ट्वीट करण्यात आला, त्याला ढिल्लन यांनी रिट्वीट करत कॅप्शन लिहीले, "लोकांचा जीव वाचवणाऱ्याला माझा सलाम..."

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याबाबत ढिल्लन म्हणाले की, ''हा फोटो 1 जुलैचा आहे. त्या दिवशी अमरनाथ यात्रा सुरू झाली होती. जेव्हा ते अमरनाथ गुफेत दर्शनासाठी जात होते, तेव्हा गुफेपासून 50 मीटर दूर स्निफर मेनका आपल्या ड्युटीवर तैनात होती. कुत्र्याने त्यांना यावेळी सॅल्यूट केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय लष्करातील सर्व सीनियर्सला आपल्या जुनियर्सला सॅल्यूट देण्याची परंपरा आहे. यामुळे लेफ्टिनेंट जनरल ढिल्लन यांनी सॅल्यूटला उत्तर देताना सॅल्यूट केले. हीच परंपरा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हे सर्व सध्या सोशल मिडीयात व्हायरल होत आहे.

धक्कादायक ! बापाचा खून करून मुलगा पोलिस ठाण्यात हजर  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The commander responded to the salute of the dog by the salute the incident of july 1 is now viral