'त्या' पुस्तकाच्या पहिल्याच पानावर चक्क शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदींमध्ये...

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 जानेवारी 2020

या पुस्तकाचे लेखक जय भगवान गोयल याने मे 2019 मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा शपथविधीचा कार्यक्रम शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक प्रमाणे करावा, अशी विनंती केली होती. तसा फोटोही तयार केला होता. पत्र लिहून त्याने ही मागणी केली होती. 

नवी दिल्ली : आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावर भाजपने बंदी घातली असली तरी या पुस्तकाच्या पहिल्या पानावरच लेखकाने छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उंचीवरून तुलना केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'झी 24 तास' या वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, या पुस्तकाच्या पहिल्याच पानावर शिवाजी महाराज आणि मोदी यांचे रेखाचित्र काढण्यात आले आहे. या रेखाचित्रातून यांची उंची समान असल्याचे लेखकाने दाखविले आहे. यावरून शिवाजी महाराज आणि मोदी यांची तुलना करण्यात आली आहे. या वादग्रस्त पुस्तकात लेखक लिहतो, ‘शिवाजी मध्यम कद के थे. इससे यकायक मेरे सामने नरेंद्र मोदी आए! वे भी मध्यम कद के ही है! पुस्तकाच्या सुरवातीलाच 'नरेंद्र मोदी और शिवाजी शारीरिक समानताए' असे पहिले प्रकरण आहे. 

Breaking : 'वादग्रस्त पुस्तकाशी संबंध नाही'; भाजपचे 'हात वर', तर लेखकाचा माफीनामा 

याबरोबरच या पुस्तकाचे लेखक जय भगवान गोयल याने मे 2019 मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा शपथविधीचा कार्यक्रम शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक प्रमाणे करावा, अशी विनंती केली होती. तसा फोटोही तयार केला होता. पत्र लिहून त्याने ही मागणी केली होती. 

पुस्तकावरून भाजपची तोंडे ‘म्यान’ झाली म्हणून...; शिवसेनेचा वार

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणारे वादग्रस्त पुस्तक लेखक जयभगवान गोयल यांनी मागे घेतल्याची माहिती भाजपने दिली आहे. "जयभगवान गोयल यांनी वैयक्तिकरीत्या पुस्तक प्रकाशित केले होते. त्याचा भाजपशी काहीही संबंध नाही. पुस्तकामुळे भावना दुखावल्या असतील, तर त्यांनी माफीही मागितली आहे. गोयल यांनीच ते पुस्तक मागे घेतले आहे. त्यामुळे आता वादावर पडदा पडेल,'' असे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.

रोहित पवार भाजपला म्हणाले, नेत्यांना लगाम घाला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: comparison between Shivaji Maharaj and PM Narendra Modi in Controversial book aaj ke shivaji narendra modi