Delhi Metro: दिल्ली मेट्रोत लेडीज सीटवर Condom जाहिरात, बघून भडकले लोक

दिल्ली मेट्रोमध्ये कंडोमच्या जाहिरातीवरून लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे
Delhi Metro Condom Advertisement
Delhi Metro Condom Advertisementesakal

दिल्ली मेट्रोमध्ये महिलांच्या राखीव सीटमागे कंडोमच्या जाहिरातीचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय. दिल्ली मेट्रोमध्ये कंडोमच्या जाहिरातीवरून लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. अनेकजण याला लाज्यास्पद म्हणताय तर अनेकजण या जाहिराच्या समर्थनार्थ बोलताना दिसलेत. मात्र लोकांकडून होणाऱ्या आक्षेपानंतर आणि प्रश्नांनंतर कंडोमची जाहिरात तेथून काढून टाकण्यात आली आहे. (Delhi Metro Condom Advertisement)

दिल्लीच्या मेट्रोमधील कंडोमच्या जाहिरातीचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या फोटोमध्ये महिलांसाठी राखीव (Reserve) सीटवर लावण्यात आलेली कंडोमची (Condom) जाहिरात दिसतेय. या जाहिरातीत एक कपल रोमँटीक अंदाजात दिसून येतंय. या जाहिरातीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत लोकांनी डीएमआरसीवर (DMRC) निशाणा साधलाय. तसेच हे लाज्यास्पद असल्याचं म्हटलंय. तर काही लोकांना ते बरोबर वाटतंय.

Delhi Metro Condom Advertisement
नुसरत भरुचानं चक्क रस्त्यावर विकले Condom; म्हणाली,'जनहित में जारी...'

ट्विटरवर या जाहिरातीचा फोटो शेअर करत एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, दिल्ली मेट्रोमधील जाहिराती लाज्यास्पद आहेत. तर दुसऱ्याने त्यावर प्रतिक्रिया देत 'यात लाज्यास्पद काय आहे, प्रत्येक गोष्टीला बघण्याचे दोन दृष्टिकोण असतात', असं लिहीलंय. एका यूजरने मेट्रोला फक्त रिवेन्यूशी देणं घेणं नसायला हवं. पैश्यांचा विषय सोडला तर इतरही गोष्टींचा विचार करायला हवा. ज्यामुळे महिला मेट्रोमध्ये प्रवास करताना कंफर्टेबल असेल. तर भडकलेल्या एका युजरने 'अशा जाहिराती मेट्रो अधिकारी त्याच्या बाहेर किंवा आत लावेल का ?'असा प्रश्न उपस्थित केलाय.

दिल्ली मेट्रोच्या मते या जाहिरातीत कुठल्याही नियमांचं उलंघन झालेलं नाही. तरी लोकांनी घेतलेल्या आक्षेपामुळे तात्पुरती ती जाहिरात काढण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com