esakal | या वादग्रस्त ट्विटमुळे भाजप नेते संबित पात्रा अडचणीत

बोलून बातमी शोधा

congres, BJP sambit patra

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांच्या विरोधात युवा काँग्रेसने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. भाजप खासदाराने देशाच्या माजी पंतप्रधानांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करुन त्यांचा अपमान केला आहे, असा आरोप युवा काँग्रेसच्या अध्यक्षाने केलाय. या प्रकरणी नवी दिल्लीत संसद मार्ग पोलिस ठाण्यात संबित पात्रा यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.   

या वादग्रस्त ट्विटमुळे भाजप नेते संबित पात्रा अडचणीत
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांच्या विरोधात युवा काँग्रेसने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. भाजप खासदाराने देशाच्या माजी पंतप्रधानांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करुन त्यांचा अपमान केला आहे, असा आरोप युवा काँग्रेसच्या अध्यक्षाने केलाय. या प्रकरणी नवी दिल्लीत संसद मार्ग पोलिस ठाण्यात संबित पात्रा यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.   

भारताचा जीडीपी शून्यावर जाणार; काळजी व्यक्त करणारा अहवाल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश काँग्रेसने ट्विटरच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधला होता. जर मध्य प्रदेशात आमचे सरकार असते तर कोरोना चाचणी, उपचार आणि मदत या सर्व स्तरावर  राज्य अव्वल स्तरावर असते. या ट्विटवर पलटवार करताना संबित पात्रा यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाचा उल्लेख करत वादग्रस्त ट्विट केले होते. 

जगाची चिंता वाढवणारी बातमी: कोरोनामुक्त वुहानमध्ये पुन्हा सापडला रुग्ण

कोरोनाजन्य परिस्थितीत काँग्रेस सत्तेत असती तर 5000 कोटींचा मास्क घोटाळा,  7000 कोटींचा कोरोना टेस्ट किट घोटाळा, 20 हजार कोटींचा जवाहर सॅनिटायझर घोटाळा आणि 26 हजार कोटींचा  राजीव गांधी व्हायरल रिसर्च घोटाळा समोर आला असता. या ट्विटसह त्यांनी पं. जवाहरलाल नेहरु आणि राजीव गांधी यांचा फोटोही शेअर केला होता. 

लॉकडाउनच पुढं काय? 

संबित पात्रा यांनी काँग्रेसवर टीका करत असताना माजी पंतप्रधानांचा अपमान करणे अयोग्य आहे, अशा प्रतिक्रिया सोशळ मीडियावर उमटत आहेत. संबित पात्रा यांना अटक करा या मागणीसाठी #ArrestSambitPatra या ट्रेंडच्या माध्यमातून अनेकजण व्यक्त होत आहे. याप्रकरणाची सखोर चौकशी करुन योग्य ती कारवाई करु, असे पोलिसांनी म्हटले आहे.