

Congress Support to Vijay TVK
ESakal
थलापती विजय यांचा पक्ष टीव्हीके तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. नवीन सरकार स्थापन होण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. काँग्रेस पक्षाने डीएमकेसोबतची आपली दीर्घकाळची युती तोडली आहे. तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसने विजय यांच्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा दिला आहे. थलापती विजय हे तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांनी विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे.