esakal | अर्ध्यावरती डाव मोडला! निवडणुकीदरम्यान काँग्रेस उमेदवाराचं निधन
sakal

बोलून बातमी शोधा

TamilNadu_Congress_Madhav_Rao

तमिळनाडूच्या ३८ जिल्ह्यांमधील विधानसभेच्या २३४ जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. ​

अर्ध्यावरती डाव मोडला! निवडणुकीदरम्यान काँग्रेस उमेदवाराचं निधन

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

Tamil nadu assembly election 2021: चेन्नई : देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. असे असतानाही पाच राज्यात विधानसभा निवडणूक पार पडत आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियम जाहीर करण्यात आले होते, पण हे सर्व नियम या निवडणुकीत गल्लीपासून दिल्लीपर्यंत धाब्यावर बसवले गेले. त्याचे परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. 

तमिळनाडूतील एका काँग्रेस नेत्याचे कोरोनामुळे निधन झाले. पी.एस.डब्ल्यू. माधव राव असं या उमेदवाराचं नाव असून ते श्रीविल्लीपुथूर मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. काही दिवसांपूर्वी ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांची तब्येत वारंवार खालावत गेली. अखेर रविवारी (ता.११) त्यांचे निधन झाले. 

भारतासाठी धोक्याची घंटा; चीन तिबेटमध्ये उभारणार जगातील सर्वांत मोठं धरण​

दरम्यान निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राव यांचे निधन झाले आहे, त्यामुळे तेथे पुन्हा मतदान होणार नाही, पण जर ते निवडणूक जिंकले, तर मात्र पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी तमिळनाडू, पुदुच्चेरी आणि गोवाचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी याबाबतची माहिती देत शोक व्यक्त केला.

तमिळनाडूच्या ३८ जिल्ह्यांमधील विधानसभेच्या २३४ जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणुकीचा निकाल २ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

J&K: १४ वर्षीय दहशतवाद्याला कंठस्नान; चकमकीत आतापर्यंत १० ठार

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)