काँग्रेसनं इतर कोणालाही दिलं नाही स्वातंत्र्य लढ्याचं श्रेय - शिवराजसिंह चौहान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shivraj singh chouhan1

काँग्रेसनं इतर कोणालाही दिलं नाही स्वातंत्र्य लढ्याचं श्रेय - चौहान

भोपाळ : काँग्रेसनं आपल्या खानदानाव्यक्तिरिक्त स्वातंत्र्य लढ्याचं श्रेय कुणालाही दिलं नाही, असा आरोप मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केला आहे. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी नाव न घेता काँग्रेसवर निशाणा साधला.

चौहान म्हणाले, "एक काळ होता जेव्हा एकच पक्ष देशावर राज्य करत होता. या पक्षानं एका खानदानाशिवाय स्वातंत्र लढ्याचं श्रेय इतर कोणालाही दिलं नाही. भगवान बिरसा मुंडा यांचा सन्मान हा संपूर्ण आदिवासी समाजाचा सन्मान आहे"

काँग्रेसच्या राजवटीत राणी कमलापती यांच्या कार्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यांच्या इतिहासाला योग्य स्थान इंग्रजांनी तर नाहीच नाही काँग्रेसनेही दिलं नाही. पण पंतप्रधानांनी हबीबगंज रेल्वे स्टेशनचं नामकरण राणी कमलापती रेल्वे स्टेशन असं करत राणीचा सन्मान वाढवला, असंही चौहान म्हणाले.

हेही वाचा: सरकारचा कारभार सुधारण्यासाठी मोदींची मोठी योजना; आठ मंत्रिगटांची स्थापना

दरम्यान, नुकत्याच एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना अभिनेत्री कंगना राणावत हीनं "स्वातंत्र्य आपल्याला भीक स्वरुपात मिळालं असून सन २०१४ पासून आपल्याला खरं स्वातंत्र्य मिळालं" अस वादग्रस्त विधान केलं होतं. यामुळं तिला देशभरातून प्रचंड टीकेला सामोरं जावं लागलं होतं. कंगनाच्या या विधानाला मराठीतील दिग्गज कलाकार विक्रम गोखले यांनीही पाठींबा दिला आहे.

loading image
go to top