सरकारचा कारभार सुधारण्यासाठी मोदींची मोठी योजना; आठ मंत्रिगटांची स्थापना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

narendra modi

सरकारचा कारभार सुधारण्यासाठी मोदींची मोठी योजना; आठ मंत्रिगटांची स्थापना

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : सरकारचा कारभार सुधारण्यासाठी मोदी सरकारनं महत्वाचे बदल करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. यासाठी तरुण व्यावसायिक, निवृत्त अधिकाऱ्यांकडून सूचना मागवणे, विविध प्रकल्पांमध्ये तंत्रज्ञानाचा सर्वोत्तम वापर केला जावा, यासाठी सर्व मंत्र्यांचे मिळून विविध आठ मंत्रिगट तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंडियन एक्स्प्रेसनं याबाबत वृत्त दिलं आहे.

हेही वाचा: अमरावती हिंसाचार : पोलिसांची मोठी कारवाई, भाजपच्या महापौरांसह तिघांना अटक

सरकारनं यासाठी ७७ मंत्र्यांची विविध गटांमध्ये विभागणी केली आहे. तंत्रज्ञानावर आधारित स्त्रोत विकसित करणे, व्यावसायिकांचा तंत्रज्ञानावर आधारित संसाधने विकसित करणे, व्यावसायिकांचा एक पूल तयार करणे, अधिक पारदर्शकता आणणे तसेच अधिक सुधारणा आणि कार्यक्षमतेसाठी सर्व मंत्र्यांच्या कार्यालयांमध्ये अवलंबले जाणाऱ्या इतर तत्सम उपक्रमांसाठी या ७७ मंत्र्यांची आठ गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे, अशी माहिती मोदी सरकारमधील सुत्रांनी दिली.

हेही वाचा: महिलेने रिक्षा चालकाला दिली कोट्यवधींची संपत्ती, जाणून घ्या कारण...

केंद्रीय मंत्र्यांचा आठ गटांमध्ये समावेश करण्याबाबतचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्र्यांच्या चिंतन शिबीरात झाला. याबाबत सरावही करण्यात आला, प्रत्येकी सुमारे पाच तास ही बैठक झाली. यामध्ये एकूण पाच सत्रं पार पडली. यामध्ये प्रत्येकाच्या वैयक्तिक कार्यक्षमता, नेमकी अंमलबजावणी, मंत्रालयांची कार्यपद्धती, सरकारमधील विविध पक्षांमधील समन्वय, प्रभावशाली संवाद आणि संसदीय व्यवस्थेचा अभ्यास यांचा समावेश होता. शेवटच्या चिंतन शिबिराला लोकसभा अध्यक्ष ओम बिरला आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांचाही समावेश होता.

सर्व बैठकांचा हेतू काय?

या सर्व बैठकांचा प्राथमिक हेतू मोदी सरकारची कार्यक्षमता आणि अंमलबजावणीची प्रक्रिया उंचावणं हा होता. यासाठी विविध मंत्रिगटांची निर्मिती करणे हे यातील पुढचं पाऊल होतं. मंत्र्यांच्या मदतीनं प्रशासनातील एकूण सुधारणांवर लक्ष केंद्रित करणे हा देखील याचा हेतून असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

मंत्रिगटांचे नेतृत्व कोणाकडे असेल?

सरकारनं तयार केलेल्या आठ मंत्रिगटाचे नेतृत्व विविध केंद्रीय मंत्र्यांकडे सोपवण्यात आले आहेत. यामध्ये हरदीपसिंग पुरी, नरेंद्र सिंह तोमर, पीयुष गोयल, धर्मेंद्र प्रधान, स्मृती इराणी, अनुराग ठाकूर यांचा समावेश आहे.

loading image
go to top