बूथ पातळीवरच काँग्रेसला मोठा धक्का; १०८ पदाधिकाऱ्यांनी सोडली पदं, अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर

Congress Politics: मल्लिकार्जुन खर्गेंच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. १०८ BLA-2 च्या राजीनाम्याने पक्ष नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
congress party

congress party

sakal

Updated on

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गोवा काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काँग्रेसच्या सुमारे १०८ बूथ लेव्हल एजंट्स (BLA-2) यांनी राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे. काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या राजीनामा पत्रांच्या प्रतीही सार्वजनिक केल्या आहेत. बूथ पातळीवरील कार्यकर्ते हे कोणत्याही राजकीय पक्षाच्या संघटनेचा महत्त्वाचा आधार असतात. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने BLA-2 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे समोर येणे ही काँग्रेसच्या संघटनात्मक व्यवस्थेसाठी गंभीर बाब मानली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com