

Congress on Sonam Wangchuk rahul gandhi
esakal
Sonam Wangchuk Hunger Strike : पर्यावरणवादी आणि शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांविरोधात उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर अखेर काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन) के. सी. वेणुगोपाल यांनी गुरुवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत वांगचुक यांच्या मागण्यांना पाठिंबा जाहीर केला. त्याचबरोबर त्यांच्या प्रकृतीची चिंता व्यक्त करत उपोषण मागे घेण्याचे आवाहनही केले.