CBI च्या छाप्यांवर किर्ती चिदंबरम म्हणाले, "मी घाबरत नाही.."

congress leader karti chidambaram on cbi raids- denies allegations on visa issue news
congress leader karti chidambaram on cbi raids- denies allegations on visa issue news

काँग्रेस खासदार कार्ति चिदंबरम यांनी मंगळवारी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आणि सीबीआय छापे टाकण्यासाठी केंद्रावर एजन्सींचा गैरवापर केल्याचा आरोप केला. चिदंबरम यांनी मंगळवारी त्यांच्यावर सीबीआयच्या कारवाईबद्दल बोलताना, मी घाबरत नाही, केंद्र सरकार पुन्हा एकदा एजन्सींचा वापर करून माझ्यावर निंदनीय आणि सरळ खोट्या कृत्यांचा आरोप करत आहे. या व्हिसा घोटाळ्याशी माझा काहीही संबंध नाही, असे म्हणत सर्व आरोप फेटाळले आहेत.

हे प्रकरण 2011 मध्ये 263 चिनी नागरिकांना व्हिसा जारी करण्याशी संबंधित कथित घोटाळ्याचे आहे. कार्ति यांचे वडील पी चिदंबरम त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री होते. याप्रकरणी कार्ती बुधवारी सीबीआयसमोर हजर होण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालय आणि विशेष सीबीआय न्यायालयाच्या परवानगीने कार्ति यांनी यूके आणि युरोपला प्रवास केला होता. सीबीआय न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना भारतात परतल्यानंतर 16 तासांच्या आत सीबीआय चौकशीला हजर राहावे लागेल. कार्ती मंगळवारी विदेश दौऱ्यावरून परतले.

congress leader karti chidambaram on cbi raids- denies allegations on visa issue news
छत्रपती संभाजी मातोश्रीवर गेले नाहीत म्हणून...; निलेश राणेंची टीका

हे प्रकरण वेदांता ग्रुप कंपनी तलवंडी साबो पॉवर लिमिटेड (TSPL) च्या उच्च अधिकार्‍याने कार्ती आणि त्यांचे जवळचे सहकारी एस भास्कररामन यांना लाच दिल्याच्या आरोपांशी संबंधित आहे. ही कंपनी पंजाबमध्ये वीज प्रकल्प उभारत होती. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, वीज प्रकल्प उभारण्याचे काम एका चिनी कंपनीकडून करण्यात येत आहे.

congress leader karti chidambaram on cbi raids- denies allegations on visa issue news
कपील सिब्बल यांची पुन्हा राज्यसभेवर? सपा किंवा ZMM देणार पाठिंबा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com