esakal | देशप्रेमाचा दावा पण देशद्रोह करताना सापडले; प्रियांका गांधींचा अर्णब गोस्वामींवर निशाणा
sakal

बोलून बातमी शोधा

priyanka gandhi

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी हे प्रकऱण म्हणजे क्रिमिनल अॅक्ट असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्यानंतर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

देशप्रेमाचा दावा पण देशद्रोह करताना सापडले; प्रियांका गांधींचा अर्णब गोस्वामींवर निशाणा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

लखनऊ - अर्णब गोस्वामींच्या चॅट लीक प्रकरणावरून विरोधक मोदी सरकारवर टीका करत आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी हे प्रकऱण म्हणजे क्रिमिनल अॅक्ट असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्यानंतर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता आणि रिपब्लिक टीव्हीचे एडीटर इन चीफ अर्णब गोस्वामी यांचे व्हॉटसअॅप चॅट लीक झाल्यानंतर त्यावरून प्रियांका गांधींनीसुद्धा टीका केली आहे. 

प्रियांका गांधी यांनी म्हटलं की,'देशप्रेमाचा दावा करणारे आहा देशद्रोह करताना सापडले आहेत.' अर्णब गोस्वामी यांचे जे चॅटिंग मुंबई क्राइम ब्रँचच्या चार्जशीटमध्ये आहे त्यात दोन वर्षांपूर्वी भारताने बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकशी संबंधित माहितीसुद्धा आहे. या चॅटवरून असं म्हटलं जात आहे की बालाकोट एअर स्ट्राइकची माहिती अर्णब गोस्वामींना आधीपासूनच होती. 

हे वाचा - नामांतराचं वारं लागलं फळाला! भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी 'ड्रॅगन फ्रूट'च केलं बारसं

प्रियांका गांधी यांनी काही ट्विट केले आहेत. त्यात म्हटलं की, देशाच्या सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती एका पत्रकाराला देण्यात आली. आपल्या देशाचे जवान हुतात्मा झाले. यावर पत्रकार म्हणतो की आपल्याला फायदा होईल. देशप्रेमाचा दावा करणारे देशद्रोह करताना सापडले आहेत. ही बाब गंभीर आहे. याची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी. 

एका बाजुला सरकार शेतकऱ्यांचे ऐकून घेत नाही तर दुसर्या बाजुला जवानांच्या आयुष्यासोबत खेळत आहेत. जय जवान, जय किसान हा देशाचा नारा आहे. सतत हा नारा देऊन काही होणार नाही. याचा अर्थ समजून घेणं आणि त्यावर कायम राहणं ही देशात हुतात्मा झालेल्यांबद्दल नेत्यांची नैतिक जबाबदारी आहे.

स्वत: संकटात असूनही भारताने निभावला शेजार धर्म; 6 देशांना पाठवतोय कोरोना लस

व्हॉटसअॅप चॅट सोशल मीडियावर लीकर झाल्यानंतर मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारला जात आहे की, ऑफिशियल सीक्रेट अॅक्टमध्ये अर्णब गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ता यांच्याविरोधात एफआयआर दाखल होणार की नाही? प्रशांत भूषण यांनी सोशल मीडियावरून या चॅटचे काही स्क्रीनशॉटही शेअर केले होते. 
 

loading image