esakal | राहुल गांधी परवानगी नसताना निघाले लखीमपूरला; सोबत दोन मुख्यमंत्री
sakal

बोलून बातमी शोधा

राहुल गांधी परवानगी नसताना निघाले लखीमपूरला; सोबत दोन मुख्यमंत्री

राहुल गांधी परवानगी नसताना निघाले लखीमपूरला; सोबत दोन मुख्यमंत्री

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर घटनेकडे आणि त्यानंतरच्या घटनाक्रमाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर भाजपच्या मंत्र्याच्या मुलाने गाडी घालून शेतकऱ्यांना चिरडून ठार मारल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सध्या व्हायरल होतो आहे. या घटनेनंतर पीडितांच्या कुटुंबियांना भेटायला निघालेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना यूपी पोलिसांनी ताब्यात घेऊन एका खोलित नजरकैदेत ठेवलं होतं. तब्बल 30 तासांनंतर त्यांची अधिकृतरित्या अटक करण्यात आली. सध्या त्या अटकेतच आहेत. आता काँग्रेस नेते राहुल गांधी या घटनेतील पीडितांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाले आहेत. सध्या लखीमपूरमध्ये कलम 144 लागू आहे. मात्र राहुल गांधी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यासमवेत यूपीला निघालेत.

हेही वाचा: 'मोदीजी, लखीमपूरला जा; संपूर्ण देश तो व्हिडीओ पाहतोय' : केजरीवाल

काही वेळापूर्वीच घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनऊमध्ये होते. मात्र ते लखीमपूर खेरीला गेले नाहीत. या घटनेला दडपलं जातंय. मृतांचे पोस्टमार्टम देखील नीटपणे केले गेलं नाही. पद्धतशीरपणे आवाज दाबला जातोय. मात्र आज मी दोन मुख्यमंत्र्यांसह लखीमपूर खेरीला जाणार आहे आणि भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आम्हाला अडवा, मारा काहीही करा. पण आम्ही जाणारच. आम्हाला दडपून टाकणं हा सरकारचा उद्धटपणा आहे. ते असं वागून शेतकऱ्यांचा प्रक्षोभ वाढवताहेत. मात्र आता आम्ही तीनच जण जातोय. कलम 144 पाच लोकांमुळे मोडतं. आम्ही तीन जण जात आहोत.

हेही वाचा: रॉबर्ट वाड्रांना पत्नीच्या भेटीची नाकारली परवानगी; म्हणाले, 'प्रियांकाच्या अटकेने...'

दुसरीकडे आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आता लखीमपूर घटनेबाबत सरकारला प्रश्न विचारलेत. त्यांनी एक व्हिडीओ जाहीर करुन आपली भूमिका मांडून सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की, लखीमपूर घटना संपूर्ण देश उघड्या डोळ्यांनी बघत असताना सरकार हे प्रकरण का दाबू इच्छित आहे? स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव एकीकडे सुरु असताना दुसरीकडे अशी दडपशाही सुरुये, हे तर ब्रिटीशांकडून व्हायचं... तुम्ही गप्प का आहात? असा प्रश्न केजरीवालांनी पंतप्रधान मोदींना विचारला आहे.

loading image
go to top