'कंगनाच्या गालापेक्षाही गुळगुळीत...'; काँग्रेस आमदाराचं वक्तव्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kangana Ranaut
'कंगनाच्या गालापेक्षाही गुळगुळीत...'; काँग्रेस आमदाराचं वक्तव्य

'कंगनाच्या गालापेक्षाही गुळगुळीत...'; काँग्रेस आमदाराचं वक्तव्य

अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असते. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असते. आता पुन्हा एकदा कंगना रणौत (Kangana Ranaut) चर्चेत आली आहे. मात्र आता कारण तिचं वादग्रस्त वक्तव्य नाही, तर एक काँग्रेस (Congress) आमदार आहे. काँग्रेस आमदाराने केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे कंगना चर्चेत आली आहे. मतदारांना आश्वासन देताना झारखंडच्या काँग्रेस आमदाराने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

झारखंडचे काँग्रेस आमदार डॉक्टर इरफान अन्सारी (Congress MLA irfan ansari) यांची मतदारांशी संवाद साधताना जीभ घसरली आहे. ते म्हणाले, मी तुम्हाला वचन देतो की, जामताऱ्याचे रस्ते 'अभिनेत्री कंगना रणौतच्या गालापेक्षाही गुळगुळीत होतील.' 14 जागतिक दर्जाच्या रस्त्यांची बांधकामं लवकरच सुरू होतील. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका होत असून, यामुळे मोठा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Video : रणगाडे, हेलिकॉप्टर, ड्रोन, मशिन गन्स; अंगावर शहारे आणणारे प्रात्यक्षिकं

हेही वाचा: कोरोना संकटात रॅली, सभांना परवानगी मिळणार? आज होणार निर्णय

यापूर्वी शिवसेनेा नेते गुलाबराव पाटील यांनीही असंच वक्तव्य केलं होतं. एकनाथ खडसेंवर टीका करताना शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील (Shivsena Minister Gulabrao Patil) यांनी रस्त्यांची तुलना अभिनेत्री हेमा मालिनीच्या (Actor Hema Malini) गालांसोबत केली. रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे नसले तर राजीनामा देईन, असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं होतं. त्यानंतर त्यांना माफीही मागावी लागली होती.

हेही वाचा: Assembly Elections 2022 : कधी, कुठे, कशा होतील निवडणुका? वाचा सविस्तर

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Congress
loading image
go to top