काँग्रेस आमदार म्हणतो, कंगना राणावतच्या गालापेक्षा जास्त रस्ते गुळगुळीत करीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Irfan Ansari and Kangana Ranaut

काँग्रेस आमदार म्हणतो, कंगनाच्या गालापेक्षा रस्ते गुळगुळीत करीन

आतापर्यंत रस्ते गुळगुळीत करण्याचा दावा करणारे राजकारणी बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी (hema malini) यांच्या गालाचे उदाहरण देत होते. मात्र, आता काँग्रेसच्या एका आमदाराने ते बदलून कंगना राणावतच्या गालाचे उदाहरण दिले आहे. काँग्रेसचे (Congress) आमदार (MLA) डॉ. इरफान अन्सारी (Irfan Ansari) यांनी झारखंडमधील जामतारा मतदारसंघातील रस्ते अभिनेत्री कंगना राणावत हिच्या गालापेक्षाही गुळगुळीत करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे ते वादात सापडले आहेत.

शुक्रवारी पोस्ट केलेल्या सेल्फी व्हिडिओमध्ये डॉ. इरफान अन्सारी हे ‘मी १४ नवीन रस्त्यांना भेट दिली आहे. चित्रपट अभिनेत्री कंगना राणावत हिच्या गालापेक्षाही हे रस्ते गुळगुळीत केले जातील, याची खात्री देतो. आमची आदिवासी मुले, तरुण आणि व्यापारी वर्ग त्या रस्त्यावरून चालतील’ असे इरफान अन्सारी (Irfan Ansari) म्हणाले.

हेही वाचा: भावासमोर बहिणीवर बलात्कार अन् बहिणीने उचलला टोकाचा पाऊल

यावेळी त्यांनी राज्यातील रघुवर दास यांच्या मागील सरकारवरही हल्लाबोल केला. भाजपच्या राजवटीत असे रस्ते कधीच बांधले गेले नसतील हे तुम्हाला दिसेल असेही ते म्हणाले. ‘भाजपने राज्य लुटण्याचे काम केले होते. रस्त्यांअभावी आज खेड्यात राहणारे आदिवासी धुमाकूळ घालत आहेत’ असेही इरफान अन्सारी (Irfan Ansari) म्हणाले.

हेही वाचा: मौनी रॉयने परिधान केला ऑफ शोल्डर ड्रेस; लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत

एखाद्याने जास्त काळ फेस मास्क घालू नये. कारण, ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. मास्कचा जास्त आणि दीर्घकाळ वापर केल्याने कार्बनडाय ऑक्साइड शरीरात जाते, असा दावा काँग्रेस आमदार (MLA) इरफान अन्सारी (Irfan Ansari) यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.

गुलाबराव पाटलांनी घेतले होते हेमा मालिनीचे नाव

जळगावच्या प्रचार सभेत एकनाथ खडसेंवर टीका करताना शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी रस्त्यांची तुलना अभिनेत्री हेमा मालिनीच्या (hema malini) गालांसोबत केली होती. रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे नसले तर राजीनामा देईन, असे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केली होती.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top