Narendra Modi: अखेर विरोधी पक्षाच्या नेत्याला मिळालं शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण, आघाडीतील पक्षांशी चर्चा करून घेणार निर्णय

Narendra Modi: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले आहे. मात्र, काँग्रेस शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही, याबाबत आघाडीतील पक्षांशी चर्चा करून आज निर्णय घेतला जाणार आहे.
Narendra Modi
Narendra ModiEsakal

नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा आज (रविवारी) संध्याकाळी राष्ट्रपती भवन इथं पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी शेजारील देशांच्या प्रमुखांना विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे. पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा संध्याकाळी 7.15 वाजता राष्ट्रपती भवनात होईल. या शपथविधीसाठी विरोधकांना निमंत्रण दिलं नसल्याने एनडीए आणि मोदीवर टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता या सोहळ्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना निमंत्रण मिळालं आहे. मात्र, काँग्रेस शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही, याबाबत आघाडीतील पक्षांशी चर्चा करून आज निर्णय घेतला जाणार आहे.

खर्गे यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण मिळण्यापूर्वी काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी आम्हाला कोणतेही निमंत्रण आले नसल्याचे सांगितले होते. 2024 च्या निवडणुका नरेंद्र मोदींचा नैतिक पराभव आहे. जयराम रमेश म्हणाले होते, "स्वयंघोषित विश्वगुरु आता स्वयंघोषित विश्वबंधू झालेत. त्यांनी आपल्या शपथविधीसाठी आंतरराष्ट्रीय नेत्यांना प्राधान्य दिलं आहे. पण अद्याप आम्हाला कुठल्याही स्वरुपाचं निमंत्रण आलेलं नाही. पण मला असं म्हणावसं वाटतंय की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींची खूपच फरफट झाली त्यांचं वैयक्तिक नुकसान झालं आहे. तसंच राजकीय हार आणि मानसिक पिछेहाट झाली आहे. आम्हाला जरी उद्याच्या शपथविधीसाठी निमंत्रण दिलेलं नसलं तरी त्याला उपस्थित राहण्यासारखं काय आहे?".

Narendra Modi
Narendra Modi: विरोधकांना मोदींच्या शपथविधीचं निमंत्रणच नाही; जयराम रमेश म्हणतात, एक तृतीयांश पंतप्रधान...

दरम्यान, काँग्रेस नेते शशी थरूर म्हणाले, 'मला वाटते शेजारील देशांना निमंत्रित करणे ही चांगली परंपरा आहे. मात्र यावेळी एका देशाला निमंत्रित करण्यात आले नाही. त्यांनी पाकिस्तानला निमंत्रित केलेले नाही. पुढे ते म्हणाले 'मला देखील शपथविधी समारंभासाठी आमंत्रित केले गेले नाही, त्यामुळे मी (भारत विरुद्ध पाकिस्तान) सामना पाहणार आहे.'

या शेजारील देशांनी निमंत्रण स्वीकारले

आज संध्याकाळी ७.१५ वाजता राष्ट्रपती भवनात होणाऱ्या पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला भारताचे शेजारी देश आणि हिंदी महासागर क्षेत्रातील नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफिफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंदकुमार जुगनाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल आणि भूतानचे पंतप्रधान डॉ. शेरिंग तोबगे यांनी समारंभाचे निमंत्रण स्वीकारले आहे.

Narendra Modi
Maharashtra Rain Alert : राज्यासाठी पुढील २४ तास महत्वाचे; 'या' भागात बरसणार मुसळधार, पुण्यासह या भागाला ऑरेंज अलर्ट

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, या नेत्यांना भारताने 'नेबरहुड फर्स्ट' धोरणाच्या प्राधान्यक्रमानुसार सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे.

राष्ट्रपती भवनात जोरदार तयारी

शपथविधी सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील लोकांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सोलापूर वंदे भारत ट्रेनच्या पायलट सुरेखा यादव यांचा भारतीय रेल्वेच्या 10 लोको पायलटमध्ये समावेश आहे ज्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले की, शपथविधीसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.

राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणातील भव्य सोहळ्याच्या तयारीचे फोटो शेअर केले जात आहेत. त्यात खुर्च्या बसवण्याबरोबरच रेड कार्पेट व इतर सजावट करण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू करून सुरक्षा वाढवली आहे आणि राष्ट्रीय राजधानीला 9 आणि 10 जून रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी नो-फ्लाइंग झोन घोषित केले आहे.

Narendra Modi
Janhavi Marathe: घाटकोपर होर्डिंग दुर्घटना; इगो मीडियाची माजी संचालक जान्हवी मराठेला गोव्यातून अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com